जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

आर्थिक समस्या सोडविण्यात रोहमारे पतसंस्थेची भूमिका अहंम-कौतुक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक पतसंस्थांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून देत गरजू नागरिकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यात मोलाची कामगीरी बजावली आहे.कोरोना संकटातही या संस्थानी आपल्या चोख व्यवहारामुळे आपले आर्थिक संतुलन टिकवून ठेवले आहे.त्यातील अग्रणी संस्था म्हणून आ.दादासाहेब रोहमारे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हि असून या संस्थेने ग्राहकांशी आपले सबंध देखील जपले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यानी नुकतेच पोहेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे माजी आ.दादासाहेब शहाजी रोहमारे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा स्थलांतर व उदघाटन सोहळा नुकताच माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव एज्युएकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त अविनाश दंडवते,संस्थेच्या अध्यक्षा क्रांतीताई रोहमारे,सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतला रोहमारे,जयंतराव रोहमारे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सचिन रोहमारे,सुनील शिंदे,आनंदराव चव्हाण,सूर्यभान कोळपे,राजेंद्र घुमरे,काकासाहेब जावळे,संजय रामराव रोहमारे,सहकारी संस्था सहाय्यक निबंधक एन.जी. ठोंबळ,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,रोहिदास होन,राहुल रोहमारे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक जयंत रोहमारे यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,अशोक रोहमारे आदिनी केले आहे.तर उपस्थितांचे स्वागत कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे यांनी केले.सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार शुभम रोहमारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close