जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

डॉ.गाढवे यांना एम.डी.मेडिसिन पदवी प्रदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने कोपरगांव येथील डॉ.अभिजीत चंद्रकांत
गाढवे यांना एम.डी.मेडिसिन (औषध तज्ज्ञ) ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. अभिजीत गाढवे यांनी कोपरगांव येथील सेवानिकेतन स्कूलमधून दहावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सद्गुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयातून पूर्ण केले. या दोन्हीही ठिकाणी त्यांनी प्रथम प्राविण्य मिळविलेले आहे. तर मुंबई ( सायन ) येथील
लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.त्यातही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

डॉ.अभिजीत गाढवे यांच्या या यशाबद्ल प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन एअर व्हाईस मार्शल डॉ.राजवीर बलवार यांच्याहस्ते वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाची समजली जाणारी एम.डी.मेडिसिन ही पदवी नुकतीच बहाल करण्यात आली.डॉ.गाढवे हे कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्ल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे,प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त व सचिव डॉ.राजेंद्र विखे,खा.डॉ.सुजय विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संचालक राजेंद्र जाधव यांच्यासह
अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close