जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यातील बहादरपुरसह तीन गावात कोरोनाचा उद्रेक!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव जिल्हा परिषद गटात कागदपत्रिय सर्वाधिक ०७ रुग्ण असून बहादरपुरात ०६ रुग्ण दिसत असले तरी जाणकारांच्या मते या ग्रामपंचायत हद्दीत जवळपास ३०० ते ३५० रुग्ण असावे असा कयास व्यक्त होत आहे.मात्र बहुतांशी रुग्ण हे खाजगी रुग्णालयांत जाऊन घरीच उपचार घेत असल्याने व बरेच रुग्ण उपचारानंतर गावात मुक्त संचार करत असल्याने त्याचा फटका गावासह नजीकच्या गावातील ग्रामस्थांना बसत आहे.त्यामुळे बहादरपूर नजीकच्या गावात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घरोघरी पाहणी पथके पाठवणे गरजेचे बनले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार १२८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १९८ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ७३ हजार ९२३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ९५ हजार ६९२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.१२ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ७१३ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.०६ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने बहादरपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कैलास रहाणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी कोपरगाव येथील कोव्हिड सेंटरला किमान १९ रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगितले आहे.तर ०२ ग्रामीण रुग्णालयात तर ०४ साईबाबा संस्थान रुग्णालयात उपचार घेत असून घरी विलगीकरणात १०-१२ रुग्ण आहे.या परिसरात विषाणूजन्य आजारांची साथ असून त्यातून असे वाटत असावे असे म्हटले आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चलचित्र बैठक सुरु असल्याचे सांगून नंतर संपर्क साधतो असे सांगितल्याने सरकारी माहिती स्पष्ट झाली नाही.तर कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी गावात ५०-५२ रुग्ण असावे असा दावा केला आहे.त्यातील काही बरे होऊन आले आहे.मात्र कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”तालुक्यात ३१ गावात रुग्ण असल्याचे मान्य करून सर्वाधिक रुग्ण बहादरपूर-२१,रांजणगाव देशमुख-९,आणि जवळके-६ या तीन गावात सक्रिय असल्याचे सांगितले आहे.परंतु खाजगी रुग्णालयातील उपचाराबाबतच्या आरोपाबाबत त्यांनी खंडन करून कोविड रुग्णांनी खाजगी वैद्यकांकडे जरी उपचार केले तरी त्याचे तपासणी अहवाल सरकारी यंत्रणेकडे ऑनलाइन उपलब्ध होत असल्याचे सांगून बहादरपूर संबंधी दावा खोडून काढला आहे.

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५१४ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १६ रुग्ण बाधित आढळले असून ४९८ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ४९६ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०४ तर अँटीजन तपासणीत १६ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०३ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण २३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर २७ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.

तर दरम्यान तालुक्यात आज आलेल्या अहवालात वारी,पोहेगाव,वैजापूर,कोळपेवाडी,चासनळी,मंजूर,ब्राम्हणगाव,कुंभारी येथे प्रत्येकी ०१ रुग्ण नोंदवले गेले आहे.बहादरपुरात मात्र बहुतांशी रुग्ण घरीच खाजगी उपचार घेऊन बरे होत असल्याचे वृत्त आहे.तर कोपरगाव शहरात ०८ रुग्ण असून लक्ष्मीनगर येथे सर्वाधिक ०४ रुग्ण बाधित आढळले आहे.तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख २१ हजार ३२२ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०६ हजार ५८६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख ०८ हजार ०३५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ७०० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close