कोपरगाव तालुका
गोदावरी नदी पात्रातील प्रवाह वाढला,नागरिकांना सतर्कतेचा इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्य झाल्याने धरणातील जलसाठा सोडण्यात आला असून त्याचे पाणी गोदावरी नदी पात्रात ३३ हजार ४९७ क्युसेकने जलप्रवाह सोडण्यात आला असून त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे खालील नागरिकांना धोका होऊ शकतो त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनीं दिनांक १४ सप्टेंबर पासून आपल्या जीविताचे व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गोदावरी नदी पात्रात जाण्याचे टाळावे व कुठलीही जोखीम पत्करू नये असे आवाहन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
“कोपरगाव तालुक्यातील गोदावरी काठच्या नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.नदी,ओढे व नाल्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे.तसेच पाणी पातळीत वाढ होता असताना नागरिकांनी नदी,ओढे,नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलंतरीत व्हावे.नदी अथवा नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये.पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये”-योगेश चंद्रे,तहसीलदार,कोपरगाव.
नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.व त्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे गोदावरी नदी पात्रातील पाण्यात अजून वाढ संभवते.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे कोपरगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधीकारणातर्फे तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले असून त्यात त्यांनी म्हटले आहे कि,”प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.नदी,ओढे व नाल्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे.तसेच पाणी पातळीत वाढ होता असताना नागरिकांनी नदी,ओढे,नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलंतरीत व्हावे.नदी अथवा नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये.पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. धोकादायक झालेल्या तलावांच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.नदीच्या प्रवाहामध्ये उतरू नये.धोकादायक ठिकाणी चढू नये,धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.मेघगर्जना होत असताना झाडाखाली अथवा विद्यूतवाहिनी जवळ थांबू नये.आपत्कालीन परिस्थितीत तहसिल कार्यालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२४२३- २२२७५३ यावर संपर्क करावा असे आवाहन शेवटी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.