शैक्षणिक
के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इंटरनेट वर जाहीर केला असून के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने kjs.vriddhionline.com या वेबसाईट वर सुरु झाली असून महाविद्यालयाचे पुणे विद्यापीठाचे करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी ए.,सीए.,बी.सी.एस.,बी.एस.एस्सी. (सूक्ष्म जीवशास्त्र) अादी चालू असल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी दिली आहे.
१२ वी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल १०० % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.१२ वी विज्ञान,कु.अरगडे सायली संजय एकूण टक्के-९५.१७ %,कु. बोधे सिद्धी अतुल एकूण टक्के-९४.१७ % रक्ताटे वैभव संजय एकूण टक्के-९३.६७ %,१२ वी वाणिज्य,वाव्हळ समाधान धर्मराज,एकूण टक्के-९३.१७%,कु.काळवाघे वैष्णवी हर्षवर्धन एकूण टक्के-९१.३३ %,कु.सुरासे विभूती गोविंद,एकूण टक्के-९१.१७%,कु.जगताप प्रियंका महादेव,एकूण टक्के-९१.१७ %,१२ वी कला कु. साबणे दिव्या सुनील एकूण टक्के-९४.३३%,कु.पंडोरे गौरी प्रकाश,एकूण टक्के-८६.०० %,कु.उगले गायत्री संजय एकूण टक्के-८५.३३%गुण प्राप्त केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,उपाध्यक्ष रामदास होन,सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,संदीप रोहमारे,संस्थेचे सर्व विश्वस्थ तसेच प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,कनिष्ठ महाविद्यालयाचे उप.प्राचार्य प्रा.सोनवणे बी.आर.,अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने kjs.vriddhionline.com या वेबसाईट वर सुरु झाली असून महाविद्यालयाचे पुणे विद्यापीठाचे करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी ए.,सीए.,बी.सी.एस.,बी.एस.एस्सी. (सूक्ष्म जीवशास्त्र) अादी चालू असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे.