खेळजगत
महर्षी विद्यालयाचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत लक्षवेधी यश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
पुणे येथील राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व नगर येथील जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज महर्षी विद्या मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महर्षी विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांत पार्थ राजेंद्र शेळके 55 कि. ग्रॅम या वजनावर वजनीगटात सुवर्ण पदक मिळविले आहे व याची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. तसेच सिध्देश गोकुळ डांगे 70 कि.ग्रॅम वजनीगटात रजत पदक, मिथिलेश संजय लोहारकर 50 कि.ग्रॅम वजनीगटात रजत पदक, यश सुनिल डांगे 60 कि.ग्रॅम. वजनीगटात कास्य पदक तर सक्षम घनशाम साळुंके यास 50 कि. मी.वजनीगटात कास्य पदक प्राप्त झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण सर्व विश्वस्त, प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेक्षिका सौ.जे.के. दरेकर, व सर्व शिक्षकवृंद आदींनी अभिनंदन केले आहे.या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे ज्युदो प्रशिक्षक योगेश बिडवे यांचे मार्गदर्शन लाभले होते.