धार्मिक
…आता जागरण-गोंधळावरील भोंग्यावर संक्रात !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सध्या संपूर्ण देशभर व विशेषतः महाराष्ट्रात सर्वत्र भोंगे व त्यांचे ध्वनिप्रदूषण या विषयावर वादविवाद,चर्चा,आंदोलने,टीकाटिप्पणी सुरू असल्याचे आपण पहातो,मस्जिदी व मंदिरांवरील भोंगे-लाऊडस्पीकरचा आवाज नियंत्रणात आणण्याचा,बंद करण्याचा विषय सुरू आहे.राजकिय,सामाजिक,धार्मिक गदारोळ वाढलेला दिसतो.अनेकांनी समजूतदारपणा दाखविलेला आहे.पण कधी कधी रात्रीच्या वेळी जागरण गोंधळाचे कार्यक्रम होत असताना त्याचे रात्रभर सुरु असणाऱ्या भोंग्यावर कोणाचेही लक्ष नाही असा खेद कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केला आहे.
खंडेरायाच्या कुलाचारामध्ये जागरण केले जाते.तर देवीच्या कुलाचारामध्ये गोंधळ घातला जातो.वर्तमानात भोंग्याचा विषय ऐरणीवर असताना रात्रभर जागून करण्यात येणारे खंडेरायाचे जागरण आणि गोंधळ या कडे मात्र दुर्लक्ष होत असून यामुळे रात्रभर रुग्ण आणि तात्यांचे नातेवाईक यांना त्रास होत आहे”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
महाराष्ट्राला लोककलांचा मोठा वारसा लाभलेला आहे.या भूमीतली प्रत्येक लोककला ही समृद्ध करणारी आहे.इथे वेगवेगळ्या भागात राहणार्या लोकांचे राहणीमान,नृत्य,गाणी,बोली भाषा, पेहराव आणि एकूणच जीवनमानातून येथील संस्कृतीच दर्शन घडत जात.लोककला संस्कृतीचा हा वारसा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे अभिमानाने पोहोचवला जात आहे.फक्त पोहोचवलाच जात नाही तर तो तितक्याच ताकदीने चालवला जात आहे.यातूनच संपन्न करणार्या कलांच प्रतिबिंब आपल्याला महाराष्ट्राच्या मातीत उमटलेल आपल्याला बघायला मिळत.यातीलच एक लोककला म्हणजे ‘जागरण-गोंधळ’ जागरण आणि गोंधळ हे दोन्ही लोककला प्रकार वेगवेगळे असले तरी त्यामध्ये बर्यापैकी साम्य आढळतं.खंडेरायाच्या कुलाचारामध्ये जागरण केले जाते.तर देवीच्या कुलाचारामध्ये गोंधळ घातला जातो.वर्तमानात भोंग्याचा विषय ऐरणीवर असताना रात्रभर जागून करण्यात येणारे खंडेरायाचे जागरण आणि गोंधळ त्याच्या भोंग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असून यामुळे रात्रभर रुग्ण आणि तात्यांचे नातेवाईक यांना त्रास होत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला आहे हा विषय कधीतरी ऐरणीवर येणार होताच तो आता या निमित्ताने आला आहे इतकेच.
त्याबाबत त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”काही ठिकाणी अक्षरशः रात्रभर जागरणाचा कार्यक्रम सुरू असतो.हॉस्पिटल्स,अत्यवस्थ रुग्ण,विद्यार्थ्यांचा अभ्यास,व्यापारी वर्गाची व सर्वांचीच विश्रांती-झोप याचा कुठलाही विचार न करता बेजबाबदारपणे रात्रीपासून पहाटे व सकाळपर्यंत मोठया आवाजात लाऊडस्पीकर वरून गोंधळ-गोंगाट सुरू असतो.धार्मिक भावनेचा विषय असल्याने याबाबत कुणी फारसे बोलत नाही.जागरण गोंधळ कार्यक्रम अवश्य व्हावेत पण भान ठेवून.कायद्यानुसार रात्री दहा वाजेपर्यंतच भोंगा लावून हा कार्यक्रम करावा,त्यांनतर लाऊडस्पीकर न लावता हा कार्यक्रम करणे सर्वांच्याच हिताचे होईल.म्हणून सर्वच भान ठेवून वागले तर समाजात कुठलाही तणाव निर्माण होणार नाही,ध्वनिप्रदूषण टळेल व कुणाचीही झोपमोड होणार नाही असे आवाहन माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.