जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

परिवर्तनाच्या तळमळीमुळे माझा विजय निश्चित – परजणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगांव तालुक्यातील गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी
आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो असून लोकांचा मिळत असलेला पाठिंबा आणि त्यांच्या मनातील
परिवर्तनाच्या तळमळीमुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांनी
नुकताच एका कार्यक्रमात व्यक्त केला आहे.
कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या दि. २१ ऑक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या निवडणुकीसाठी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशपरजणे हे अपक्ष उमेदवारी करीत असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ जुनीगंगा देवी मंदिरात आज मंगळवारी आज सकाळी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

दोन्ही घराण्याच्या प्रस्तापितशाहीला कंटाळून लोक स्वतः बाहेर पडत आहेत. माझ्या उमेदवारीने आता तिसरा पर्याय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन निश्चित आहे.आमचे हे वादळ आता कुणीच थोपवू शकत नाही याची मला खात्री आहे. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते सध्या अतिशय खराब झालेले आहेत. दळणवळणाच्यादृष्टीने हे रस्ते धोकादायक बनलेले आहेत-राजेश परजणे

याप्रसंगी महानंदचे माजी संचालक राजेंद्र जाधव, कृष्णराव परजणे,विवेक परजणे, गणेश कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब शेळके, माजी जि. प. सदस्य राजेंद्र लहारे,वाकडीचे सरपंच डॉ. संपतराव शेळके, ज्ञानदेव शेळके,डॉ. धनंजय धनवटे, भागवतराव धनवटे, विजय धनवटे,बापुसाहेब लहारे, यशवंतराव चौधरी, संदीप लहारे, नारायणराव शेळके, पाराजी आहेर, बाबासाहेब कोते, ज्ञानदेवगुडघे, बाबासाहेब फटांगरे, नानासाहेब सिनगर, उत्तमराव माने, निवृती नवले, यशवंत गव्हाणे, सुनील खालकर, भाऊसाहेब कदम, गोपीनाथ केदार, भिकाजी थोरात, सुभाषराव होन, सरपंच जयवंत मोरे, भास्करराव घोरपडे, शफीलाल सय्यद, सोपान चांदर, लक्ष्मणराव साबळे, खंडू फेफाळे, चंद्रकांत शिंदे, मनीष शहा, सचिन अजमेरे, बाबासाहेब परजणे, भरतराव बोरनारे, पंढरीनाथ आबक, रमेशराव बोरनारे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव परजणे, अशोकराव काजळे, दादापाटील दुपके, सिताराम कांडेकर, भाऊसाहेब काळे, बबनराव शिंदे, प्रा.वसंतराव दहे, बबनराव शिलेदार, जगदीश रोहमारे, गोरखनाथ शिंदे, सयराम कोळसे, सुदामराव शिंदे, शिवनाथ खिलारी, अॅड, गंगाधर कोताडे, शंकरराव पानगव्हाणे, नरेंद्र ललवाणी, प्रभाकर घाटे, संजय टुपके, रामभाऊ निकम यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले, तालुक्यातील कार्यकर्ते केंद्रबिंदू समजून आपण निवडणुकीत उतरलो आहे.नामदेवराव परजणे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जो विश्वास आणि जे प्रेम निर्माण केले होते ते किंचितही कमी झालेले नाही. दोन्ही घराण्याच्या प्रस्तापितशाहीला कंटाळून लोक स्वतः बाहेर पडत आहेत. माझ्या उमेदवारीने आता तिसरा पर्याय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन निश्चित आहे.आमचे हे वादळ आता कुणीच थोपवू शकत नाही याची मला खात्री आहे. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते सध्या अतिशय खराब झालेले आहेत. दळणवळणाच्यादृष्टीने हे रस्ते धोकादायक बनलेले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा झाडी झुडपे वाढल्याने रस्त्यांचे मूळ स्वरुप नष्ट झालेले आहे. सर्वच रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी गांवोगांवी सुरु असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे काही गांवातून बंद झालेल्या आहेत. आजारी रुग्ण, दूध उत्पादक शेतकरी तसेच शाळकरी मुला – मुलींची बसअभावी हेळसांड झालेली आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळकरी मुलां – मुलींवर बससाठी आंदोलने करण्याची दुर्दैवी परिस्थिती ओढावली आहे. शहरातही पिण्याच्या पाण्याबरोबरच रस्ते, आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अतिक्रमणधारकांचा प्रश्न आठ वर्षापासून प्रलंबित आहे. ही सर्व परिस्थिती आता आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी तिसरा पर्याय म्हणून यावेळी मला संधी द्या. कामे केली नाही तर मी स्वतः राजीनामा देऊन सत्तेवरुन पायउतार होईल असेही श्री परजणे यांनी शेवटी सांगितले आहे .प्रचार शुभारंभासाठी तालुक्यातून बहू संख्य नागरिक उपस्थित होते.देवीच्या मंदिरातील कार्यक्रम आटोल्यानंतर श्नी परजणे यांनी कोपरगांवातील सराफ बाजारपेठेतील श्री महादेव व श्री गणपती मंदिरात दर्शन घेवून प्रचाराचा शुभारंभ केला. उपस्थितांचे अॅड. बाळासाहेब कडू यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close