कोपरगाव तालुका
कोपरगाव बस आगारात गांधी जयंती उत्साहात साजरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगारात स्वच्छता मोहीम राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आगार प्रमुख अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
महात्मा गांधी यांचा आणि स्वच्छतेचा जवळचा संबंध होता.त्यांनी कायम स्वावलंबी रहाण्याचा प्रयत्न केला.व माणसाच्या आयुष्यात स्वच्छता श्वासाइतकीच महत्वाची असल्याचे सांगितले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी एकल वापर प्लास्टिक वापरास बंदी घातली आहे.सत्तेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी स्वतः झाडू हाती घेऊन देशाची स्वच्छता केली व आजही ये स्वच्छतेला तेवढंच महत्व देत आहे.त्यामुळे कोपरगाव बस आगारातही आगार प्रमुख अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थिती गांधी जयंती स्वच्छता मोहीम राबून केली.त्यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन वर्तमान शेड परिसरात हि मोहीम राबवली.त्यावेळी आगार कार्य शाळा प्रभारक सौ.संगमकर मॅडम.सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण बिडवे, सौ.एस.आर.गवळी,व्हि. डी. जाधव,श्री ए. एस. श्रीगादी, वाहन चालक,वाहक आदी मान्यवर उपस्थित होते.