जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावच्या जनतेची बेपर्वाई धोकादायक पातळीवर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाचा कहर वाढत असताना व अनेक नागरिकांचा बळी गेला असताना काही नागरिक मात्र किरकोळ खरेदीसाठी शहरात सकाळी नाहक गर्दी करून कोरोनाच्या मोठ्या संकटाला आमंत्रण देत असून या गोष्टीला फाटा दिला नाही तर काही विपरीत घटना घडण्याची शक्यता असून यापासून काही बोध घ्यावा असा असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवये दिला आहे.

राज्यात एकूण ३६ लाख ९८ हजार ३५४ सक्रिय रुग्ण आहेत.कोपरगावातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असताना तालुक्यात आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर रुग्ण बळी गेले आहे.तरीही नागरिक सकाळी आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी व नागरिकांच्या प्राथमिक गरजांसाठी संचार करण्याची सूट दिली असताना गरजेपेक्षा जास्त गर्दी करून कोरोना संकटाला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे-विजय वहाडणे,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

देशात अनेक राज्यांची लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यु सारख्या पर्यायांचा वापर सुरू केला असला तरी कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.गेल्या २४ तासात देशात कोरोनाच्या तीन लाख २३ हजार १४४ नव्या रुग्णांची भर पडली तर २ हजार ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदवस वाढत आहे.राज्यात आज ४८ हजार ७०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.तर आज ७१ हजार ७३६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत एकूण ३६ लाख ०१ हजार ७९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.९२ टक्के झाले आहे.राज्यात एकूण ३६ लाख ९८ हजार ३५४ सक्रिय रुग्ण आहेत.कोपरगावातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असताना तालुक्यात आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर रुग्ण बळी गेले आहे.तरीही नागरिक सकाळी आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी व नागरिकांच्या प्राथमिक गरजांसाठी संचार करण्याची सूट दिली असताना गरजेपेक्षा जास्त गर्दी करून कोरोना संकटाला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे.सोमवारी तर जनतेने कहर केला असून शहरातील गुरुद्वारा रोड,गोदावरी पेट्रोल पंप ते वीर सावरकर चौक या मुख्य रस्त्यांवर भाजीपाला व इतर खरेदीसाठी प्रचंड गर्दि केली होती.रस्त्याने चालणेही अवघड झाले होते.भाजीपाला व फळे यांची दुकाने मांडायची परवानगी नसताना काहींनी हा प्रकार केला आहे.नगरपरिषदेचे कर्मचारी-अधिकारी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये रात्रंदिवस काम करत आहेत.अंत्यसंस्कारही हेच कर्मचारी करत असून याच कर्मचाऱ्यांना रस्त्यावर दुकाने थाटून बसलेले काहीजण याच कर्मचाऱ्यांना दमबाजी करण्याचा निंदनीय प्रकार करत होते.गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला,मृत्यूचेही प्रमाण वाढले तरीही काहीजण बिनधोकपणे गर्दि करत आहेत.याच गर्दीचे फोटो,बातम्या झळकल्याने प्रशासन नाहक बदनाम होत आहे.नगरपरिषद,पोलीस-महसूल विभाग,वैद्यकीय सेवा करणारे सर्वजण अतिशय परिश्रम घेत असतांनाही दोषारोप सहन करावे लागतात.नागरिकांचे जिवित रक्षणासाठी प्रयत्न करणारी यंत्रणा थकली तर काय? याचा विचार होणार आहे कि नाही? असा संतप्त सवाल वहाडणे यांनी विचारला आहे.आपण आपल्याच कोरोना रुग्णाजवळही जाऊ शकत नाही,याची जाणीव ठेवून जनतेने सहकार्य करावे,भाजी व फळे विक्रेत्यांनी दुकाने मांडून बसू नये तसा शासकिय आदेशही आहे.नागरिकांनी संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडून गर्दि करू नये.विक्रेत्यांनी घरपोच सेवाच द्यावी.आज नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी-सर्व पोलीस यांच्यासह आम्ही शहरात अनेक ठिकाणी फिरून गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांना आवाहनही केले. यानंतर नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही हे खेदजनक आहे नागरिकांनी आगामी काळात अद्याप मोठा धोका आहे हे ओळखून मदत करावी असे आवाहनही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close