कोपरगाव तालुका
कोपरगावात तपासणी संचाचा मोठा तुटवडा,आ.काळेंनी केली मदत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात आहे त्यामुळे आरोग्य विभागाला तपासणी संचाचा मोठ्या प्राणावर तुटवडा जाणवत आहे हि गरज ओळखून आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी आरोग्य विभागाला तपासणीसाठी एक हजार तपासणी संच उपलब्ध करून दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगावातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असताना तालुक्यात आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर रुग्ण बळी गेले आहे.या पार्श्वभूमीवर रुग्णांची तपासणी करण्यासाठी कोरोना तपासणी संचाची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे.त्यामुळे आरोग्य विभागाला तपासणीसाठी मर्यादा येत आहे.हि गरज ओळखून कोपरगावचे आ.काळे यांनी नुकतीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची या संदर्भात भेट घेतली होती.मात्र आतापर्यंत ती मदत मिळाली नसताना त्यांनी स्वनिधीतून हि मदत केली आहे.
गेल्या २४ तासात देशात कोरोनाच्या तीन लाख २३ हजार १४४ नव्या रुग्णांची भर पडली तर २ हजार ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदवस वाढत आहे.राज्यात आज ४८ हजार ७०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.तर आज ७१ हजार ७३६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.९२ टक्के झाले आहे.राज्यात एकूण ३६ लाख ९८ हजार ३५४ सक्रिय रुग्ण आहेत.कोपरगावातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असताना तालुक्यात आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर रुग्ण बळी गेले आहे.या पार्श्वभूमीवर रुग्णांची तपासणी करण्यासाठी कोरोना तपासणी संचाची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे.त्यामुळे आरोग्य विभागाला तपासणीसाठी मर्यादा येत आहे.हि गरज ओळखून कोपरगावचे आ.काळे यांनी नुकतीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची या संदर्भात भेट घेतली होती.त्यांच्या माध्यमातून लवकरच कोपरगाव तालुक्यासाठी तपासणी संचाची पुरवठा होणार आहे.मात्र सध्या तात्पुरत्या स्वरुपात उद्भवलेली या संचाची कमतरता दूर करण्यासाठी आ.काळे यांनी स्वखर्चातून १ हजार संच आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हे संच ग्रामीण रुग्णालय तसेच सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पोहोच करण्यात आलेआहेत.
हे संच उपलब्ध करून दिल्याबद्दल तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,डॉ.कृष्णा फुलसौंदर,तालुका आरोग्याधिकारी संतोष विधाते,डॉ.वैशाली आव्हाड आदींनी आभार मानले आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरखनाथ जामदार,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,नगरसेवक मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,डॉ.तुषार गलांडे आदी उपस्थित होते.