लोहगाव ( वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव परिसरात कोव्हिड-१९ च्या वाढत्या रुग्ण संख्या मुळे लोहगाव ग्रामपंचायतच्या वतीने नुकतीच निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांत देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे.जवळपास दीड लाखांहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्यामुळं आता कोरोनाची धास्ती आणखी वाढली आहे.त्याला राहाता तालुक्यातील लोहगाव अपवाद नाही.
देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा विक्रमी वाढ देशात काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.नव्यानं कोरोना रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात दिवसागणिक अधिकाधिक भर पडत असल्यामुळं आता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे मोठी आव्हानं उभी राहत आहेत.केंद्रीय आरोग्य विभागानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांत देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे.जवळपास दीड लाखांहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्यामुळं आता कोरोनाची धास्ती आणखी वाढली आहे.त्याला राहाता तालुक्यातील लोहगाव अपवाद नाही.
या ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण फवारणी सुरू केली आहे.या मध्ये सातत्य व नियोजन करणे महत्त्वाचे आहे.वाढती उष्णता व दमट हवामानामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले होती. परंतु निर्जंतुकीकरण फवारणी केल्यास डासांचे व इतर साथीच्या आजारावर आळा बसण्यास मदत होणार आहे. दर महिन्याला निर्जंतुकीकरणच्या दोन फवारण्या कराव्या व फवारणी करण्यापूर्वी नागरिकांमध्ये आदल्या दिवशी फवारणीबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे