जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शहरवासियांनी आयुष्यमान योजनेचा लाभ घ्या-नगराध्यक्ष वहाडणे

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)


    शहरातील दारिद्र्य रेषेखालील सामाजिक आर्थिक जात निहाय जनगणनेच्या आधारे स्थापित स्वयंसहाय्यता बचत गटामधील सदस्यांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.


    कोपरगाव नगरपरिषदे मार्फत महिला बचत गटांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर दीनदयाळ अत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, स्वास्थ परिवार या कार्यक्रमांतर्गत शहरातील दारिद्र्य रेषेखालील सामाजिक आर्थिक जात निहाय जनगणनेच्या आधारे स्थापित महिला स्वयंसहाय्यता बचत गटामधील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

   

सदर कार्यक्रमास मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे, नगरसेवक मेहमुद सय्यद, सत्येन मुंदडा, महिला बाल कल्याण सभापती भरती वायखींडे ,हर्षा कांबळे, वर्षा शिंगाडे, सुवर्णा सोनवणे, आत्मा मालिक हॉस्पिटल संचालित एव्हर हेल्दी हॉस्पिटलचे डॉ.ऋशाली केंद्रे ,विक्रम खराडे, मनीषा मुजमुले, यास्मिन शेख, वैशाली कापसे, विभागीय समन्वयक हर्षा पाटील, सहयोगिनी गौरी जाधव, उषा पाटील, दी.अं.योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहर अभियान कक्षातील तांत्रिक तज्ञ महारुद्र गालट आणि रामनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
      याप्रसंगी मुख्याधिकारी सरोदे यांनी एसईसीसी च्या यादी मध्ये आपल्या शहरातील पाच हजार साठ कुटुंबाचा सहभाग झालेला असून या कुटुंबातील पात्र सर्व सदस्यांनी आयुष्यमान भारत अभियानाचा लाभ घेण्यासाठी महाईसेवा केंद्रा मार्फत सुवर्ण पुस्तिकेसाठी करिता नाव नोंदणी करावी असे आवाहन करून या अभियाना अंतर्गत स्थापित बारा महिला स्वयं सहाय्यता बचत गटांना फिरता निधी प्रत्येकी रु.दहा हजार प्रमाणे वितरीत करण्यात आला.आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत गटातील सदस्यांना सुवर्ण पुस्तिकेचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती शेवटी दिली आहे.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारुद्र गालट यांनी तर विविध आरोग्य योजने बाबत  रामनाथ जाधव यांनी माहिती दिली. स्वच्छ सर्वेक्षण व  महिलांचा सहभाग या बाबत  सुनिल गोर्डे व सुरेखा कुमावत यांनी माहिती दिली. नगरपरिषदे मार्फत राबविण्यात येत असलेल्या जलशक्ती बाबत त्या विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी मार्गदर्शन केले.उपस्थितांचे आभार माविम  हर्षा पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close