जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बहादरपुरात उपसरपंचास भर ग्रामसभेत मारहाण,पोलीस अधिकाऱ्यांनी केला समझोता!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील विकासकामाबाबत कायम अग्रणी असलेल्या बहादरपुरात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास संपन्न झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ग्रामसभेत रोजगार हमीच्या कामातून न केलेल्या कामाचे बहात्तर हजाराचे बिल का काढले ? असा प्रश्न विचारल्याचा राग येऊन सत्ताधारी गटाच्या माजी सरपंचाच्या दोघा बंधूंना राग येऊन त्यांनी उपसरपंच गोपीनाथ पराजी रहाणे यांच्या कानशीलात लगावल्याने या ग्रामसभेत पुरता गोंधळ उडाला असून या बाबत सभा तहकूब करून गावातील सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करून या कामी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापासून उपसरपंच यांना परावृत्त केल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगावचे तहसीलदार योगेश चन्द्रे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाच्या बाबत आढावा बैठक आयोजित करण्यास बहादरपूर ग्रामपंचायतीस सांगितले होते त्या प्रमाणे काल ग्रामसेवकांचा वर्तमानात संप चालू असल्याने तेथील सरपंच सुनीता रहाणे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री डोंगरे यांच्या अधिपत्याखाली,पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे व पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिक नाना पोपट पाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु असताना या सभेत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेण्याचे काम सुरु असताना हा प्रकार घडला आहे.

दरम्यान या प्रकरणी उपसरपंच गोपीनाथ रहाणे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे व आपल्याला ग्रामसभेत मारहाण झाली असल्याचे सांगून या दंडेलशाहिचा निषेध केला आहे.व ग्रामस्थांनी व काही पोलीस अधिकाऱ्यांनी गणपती विसर्जनाचे पार्श्वभूमीवर दोन्ही गटात समझोता घडवून आणला असून पुढील भूमिका आपण तूर्त थांबवली असल्याचे सांगितले आहे.व आमचा अन्यायाच्या विरोधात लढा या पुढेही सुरु ठेवणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

बहादरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोपीनाथ रहाणे यांनी या सभेत सरपंच सुनीता रहाणे याना गावात वृक्षजीवन फाउंडेशनने गावात सुमारे दोन हजार वृक्षांची लागवड केली असून त्याची सर्व देखभाल सामाजिक संस्थाच करत असताना त्याची देखभाल व पाणी टाकण्याचे बिल रुपये बहात्तर हजार इतके बिल कसे काढले ? असा सवाल केला. त्याचा याचा राग येऊन महिला सरपंच यांच्या पतीला याचा राग आला व ते उपसरपंच गोपीनाथ रहाणे यांना अद्वातद्वा बोलत असताना सरपंच यांचेबंधु व सरपंच यांचे दीर-भाया यांनी थेट प्रश्न विचारणाऱ्या उपसरपंच गोपीनाथ रहाणे यांच्या कानशिलात लगावली तर दुसऱ्याने धक्काबुक्की केली.

दरम्यान या बाबत शिर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी या प्रकरणी दुजोरा दिला असून गुन्हा दाखल करण्यास काही लोक आले होते तथापि नंतर पुन्हा ग्रामसभा घेऊन तो वाद त्यांनी आपसा-आपसात मिटवला असून आपण घटनास्थळाला भेट दिली असून तक्रार दिल्यावर पोलीस आपली कारवाई करतील त्यात कसूर होणार नाही असे स्पष्ट बजावले आहे.

दरम्यान पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणें,माजी उपसरपंच गंगाधर रहाणे, रामनाथ पाडेकर व अन्य जेष्ठ कार्यकर्ते यांनी मध्यस्थी करत सोडावा सोडावी केली.दरम्यान ज्या उपसरपंचास मारहाण झाली ते थेट शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी या बाबत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता तेथे काही जेष्ठ नागरिक पुन्हा पोहचले त्यांनी या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा ग्रामसभा घेण्याचा आग्रह धरला व पुन्हा ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी सरपंचाचे पती व माजी सरपंच कैलास रहाणे यांनी ग्रामसभेत माफी मागितली.मात्र ज्या इसमानी उपसरपंच गोपीनाथ रहाणे यांचेवर हात टाकला त्यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close