आरोग्य
कोपरगावात कोरोनाचा पुन्हा कहर,मोठी संख्या बाधित !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार १४९ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ९५ असून आज पर्यंत ४८ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.५२ टक्के आहे.तर एकूण २१ हजार ७३१ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८६ हजार ९४४ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १४.४९ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ००६ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९५.४६ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.२१ झालं आहे.दरम्यान मागील २४ तासात २२ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत ५२ हजार ५०० जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.तर गत दोन दिवसात दोघाना जीव गमवावा लागला आहे.
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख २८ हजार ४७१ वर पोहोचली आहे.आतापर्यंत एकूण २० लाख ७७ हजार ११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर राज्यात एकूण ९७ हजार ६३७ सक्रिय रुग्ण आहेत.सध्या ०४ लाख ४१ हजार ७०२ जण घरीच विलगीकरणात असून ०४ हजार ०९८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
कोपरगावात आज आलेल्या आकडेवारीत बाधित रुग्णांत करंजीत ०३ महिला वय-६७,१८,४२ तर पुरुष ०३ पुरुष वय-४०,२१,७० आदींचा समावेश आहे.तर कोपरगावात ०८ पुरुष वय-२९,३८,४९,३१,३२,७०,६६,६० तर ०२ महिला वय-२२,३२,आदींचा समावेश आहे.या शिवाय टाकळीत एक पुरुष वय-२६,सडे येथील दोन पुरुष वय-६०,५८ तर एक महिला वय-२८ आदीं ०३ रुग्णांचा समावेश आहे.त्या खेरीज वारीत एक पुरुष वय-३१ यांचा समावेश आहे.तर शिंगणापूर येथील एक पुरुष वय-५३ यांचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.