जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

निळवंडे कालव्यासांठी मोठी आर्थिक तरतूद-कालवा समितीने केले स्वागत

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी वरदान ठरण्याऱ्या निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी अर्थ संकल्पात ४०० कोटी तर पुरवणी अर्थसंकल्पात १०० अशी पाचशे ५०० कोटींची तरतूद झाल्याशी माहिती उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली असल्याने निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करुन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील व अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.

दरम्यान या प्रकल्पाच्या भिंतीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे.या प्रकळपाच्या मुख्य कालव्यांची कामे ५१.६५ टक्के तर जानेवारी २०२१ अखेर ०१ हजार ५३९ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाला आहे.गत आर्थिक वर्षात १६९ कोटी ५९ लाखांचा खर्च झालेला आहे.तर गत वर्षी अर्थसंकल्पात १०५ तर नाबार्ड अंतर्गत ७० कोटी अशी १७५ कोटींची तरतूद झालेली होती.प्रकल्पास दि.२१ जून २०१७ रोजी २३६९.९५ कोटींची चतुर्थ सुप्रमा समितीने पाठपुरावा करून मिळवली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अप्पर प्रवरा-२ (निळवंडे प्रकल्प) या प्रकल्पाला प्रथम मंजुरी दि.१४ जुलै १९७० रोजी मिळाली.आजता गायत या प्रकल्पाला पन्नास वर्ष उलटली आहे.मात्र तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.कालव्यांची कामे आधी होणे अभीप्रेत असताना येथे धरणाची भिंत आधी व कालवे पन्नास वर्षातही होऊ शकले नाही.त्यामुळे या प्रस्तावित लाभक्षेत्राखालील १९० दुष्काळी गावातील जवळपास ६८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र शेती सिंचना पासून वंचित राहिले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे.शिवाय या भागात शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी विवाहासाठी मुली देत नसल्याने मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला होता.या गावातील शेतकऱ्यांना शेती असूनही त्यांना खडी फोडण्यासाठी दुर्दैवाने जावे लागत होते.या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम जवळपास पन्नास टक्के बाकी आहे.त्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता आहे.याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने शासन दरबारी आंदोलने करत असून उच्च न्यायालय औरंगाबाद यांचेकडे जनहित याचिकेद्वारे पाठपुरावा करून शासनास जेरीस आणले आहे.आता हा प्रकल्प दृष्टी पथात आला आहे.कालव्यांची कामे वेगाने सूरु असून पुढील वर्षी जूनमध्ये पाणी येण्याची अपेक्षा आहे.दरम्यान आज जाहीर होणाऱ्या अर्थ संकल्पात नेमकी किती तरतूद होणार याकडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.याबाबत आमच्या प्रतिनिधीने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”निळवंडे प्रकल्पासाठी मुख्य अर्थसंकल्पात ४०० कोटी तर पुरवणी अर्थसंकल्पात १०० कोटी अशी ५०० कोटींची तरतूद झाल्याची” माहिती दिली आहे.त्याला निळवंडे प्रकल्पाचे नुकतेच बढतीवर बदलून गेलेले अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी दुजोरा दिला आहे.यात प्रशासकीय अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

निळवंडे कालवा कृती समितीने यापूर्वीच सरकारकडे दि.११ जून रोजी पत्रव्यवहार करून ११०० कोटी रुपयांची मागणी केली होती.त्याबाबत जलसंपदा विभागाने दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी जा.क्रं.उ.प्र.वि./प्र.शा.-२/४९३ /सन-२०२१ अन्वये पत्रव्यवहार करून जलसंपदा विभागाकडे निधीची मागणी केली होती.दरम्यान याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जनहित याचिका अद्याप प्रलंबित असल्याची माहिती कालवा कृती समितीचे अड्.अजित काळे यांनी दिली आहे.

दरम्यान या प्रकल्पाच्या भिंतीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे.या प्रकळपाच्या मुख्य कालव्यांची कामे ५१.६५ टक्के तर जानेवारी २०२१ अखेर ०१ हजार ५३९ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाला आहे.गत आर्थिक वर्षात १६९ कोटी ५९ लाखांचा खर्च झालेला आहे.तर गत वर्षी अर्थसंकल्पात १०५ तर नाबार्ड अंतर्गत ७० कोटी अशी १७५ कोटींची तरतूद झालेली होती.प्रकल्पास दि.२१ जून २०१७ रोजी २३६९.९५ कोटींची चतुर्थ सुप्रमा प्राप्त आहे.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार जलसंपदाचे नगर येथील अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांनी ३६५ कोटींची तरतूद झाल्याचे म्हटले आहे.

या मोठ्या आर्थिक तरतुदीबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक पत्रकार नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष-मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष-एस.यू.उऱ्हे सर,नानासाहेब गाढवे व संजय गुंजाळ,सचिव कैलास गव्हाणे,संघटक-संदेश देशमुख,वामनराव शिंदे,माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,रमेश दिघे,उत्तमराव जोंधळे,अशोक गांडूळे,विठ्ठलराव देशमुख,सचिन मोमले,महेश लहारे,नामदेव दिघे,पाटीलबा दिघे,कौसर सय्यद,आप्पासाहेब कोल्हे,अड.योगेश खालकर,रावसाहेब मासाळ,नवनाथ शिरोळे,सोमनाथ दरंदले,विठ्लराव पोकळे,दत्तात्रय आहेर,बाळासाहेब सोनवणे,आबासाहेब सोनवणे,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,रामनाथ ढमाले सर,जनार्दन लांडगे,सोपान थोरात,गोरक्षनाथ शिंदे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,दिलीप खालकर,भाऊसाहेब देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close