वन व पर्यावरण
…या तालुक्यात बिबट्याचा वावर,शेतकऱ्यांत भीती !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात ब्राम्हणगाव येथील बोरावके फळबाग सोसायटीजवळ काल पासून सलग दोन दिवसापासून बिबट्याचे ऐन दुपारच्या वेळी दर्शन होत असल्याचे शेतकरी आणि मजुर वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्याने या भागातील कुत्री आणि शेळ्या फस्त केल्या असल्याची माहिती सुरेश वाबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

काल दुपारी कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात बोरावके फळबाग सोसायटीजवळ काल पासून सलग दोन दिवसापासून बिबट्याचे ऐन दुपारी तीन ते चार वाजेच्य दरम्यान दर्शन होत आहे.या गावात गट क्रमांक ३९० मध्ये विहिरीवर तो दिसत आहे.मात्र त्याने अद्याप तरी माणसांना व शेतकऱ्यांना हानी पोहचवली नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”संवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी भागात साधारण दोन महिन्यापूर्वी बिबट्याचे दर्शन होऊन त्या भागातील अनेक कुत्र्यांना ठार करुन त्यांचा फडशा पाडल्याच्या घटनेला दोन महिना उलटत नाही तोच याच महिन्यातील दोन मे रोजी संवत्सर शिवारात पुन्हा एकदा त्याने आपले स्वरूप दाखवले होते व धार्मिक आस्थेचे प्रतीक असलेल्या बाळू मामाच्या मेंढ्यावर हल्ला चढवला असल्याचे निदर्शनास आले होते.त्यानंतर कोपरगाव तालुक्यात बिबट्या आल्याची वार्ता नव्हती मात्र काल दुपारी कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात बोरावके फळबाग सोसायटीजवळ काल पासून सलग दोन दिवसापासून बिबट्याचे ऐन दुपारी तीन ते चार वाजेच्य दरम्यान दर्शन होत आहे.या गावात गट क्रमांक ३९० मध्ये विहिरीवर तो दिसत आहे.मात्र त्याने अद्याप तरी माणसांना व शेतकऱ्यांना हानी पोहचवली नसल्याचे दिसून येत असले तरी त्याने या भागातील कुत्री आणि शेळ्या फस्त केल्या असल्याची माहिती तेथील शेतकरी सुरेश वाबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे शेतकरी,महिला आणि मजुर वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान ब्राम्हण गाव आणि परिसरात उसाचे मोठे क्षेत्र असल्याचे बिबट्यांना मोठे आश्रयस्थान लाभले असल्याचे व त्याला आपले आवडते खाद्य सहज उपलब्ध होत असल्याचे त्याचा या भागात मुक्काम वाढला असून तो सलग दोन दिवस दिसत असल्याने काही मनुष्य हानी होण्याच्या आत कोपरगाव वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी सुरेश वाबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.