जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यापार

आम्मा असोसिएशन तर्फे १०पी.जी.आर.उत्पादने नोंदणी प्रक्रिया सुरु

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारत सरकारने वनस्पती वाढ उत्तेजक (पी.जी.आर.) नोंदणी प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना नुकत्याच जाहीर करून त्याचे फर्टीलायझर कंट्रोल कायदा ८५ मधे रूपांतर केले आहे.त्यामुळे लघु उद्योजकांना मोठा दिलासा दिला असल्याची माहिती अश्वमेध ऍग्रोटेकचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या बदलाने नवीन नवद्योजकांना (स्टार्टअपला) चालना मिळून उद्योजकता विकास होईल व सरकारच्या धोरणाला गती हि मिळेल.उत्पादन वाढीचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,अध्यक्ष,अग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गॅनिझम मॅन्यूफॅक्चरर असोसिएशन.

अग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गॅनिझम मॅन्यूफॅक्चरर असोसिएशन (आम्मा ) मार्फत निवडक १० उत्पादने नोंदणीसाठी निश्चित कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना असोसिअशन तर्फे आम्माचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे,उपाध्यक्ष डॉ रामनाथ जगताप,सेक्रेटरी प्रशांत धारणकर,संचालक लक्ष्मण डोळे यांनी जाहीर केले आहे.

देशात लघुउद्योग क्षेत्रातील उद्योजक मोठ्या प्रमाणात असून त्यांनी उच्च दर्जाचं संशोधन केले आहे जे नोंदणीच्या प्रतिक्षेत होते.या उत्पादनांना राजमान्यता मिळाल्यांनतर शेतकऱ्यांचा उत्पादन वाढीचा मार्ग मोकळा होत आहे.

या बदलाने नवीन नवद्योजकांना (स्टार्टअपला) चालना मिळून उद्योजकता विकास होईल व सरकारच्या धोरणाला गती हि मिळेल.उत्पादन वाढीचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तसेच लघु उद्योगामध्ये वनस्पती वाढ उत्तेजक उत्पादने जागतिक पातळीवर पोहचून भारत त्याचे हब म्हणून लवकरच ओळख निर्माण करेल असा विश्वास अग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गॅनिझम मॅन्यूफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close