कोपरगाव तालुका
तहसीलदारांसमोर चालणारे खटले,पंचनामे चलचित्रीत करावे-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रात शेतकर् यांमध्ये आपापसात शेतजमिनीतील रस्ते,हद्दी आदी कारणावरून सातत्याने वाद वाढत चालले आहेत.सदरची प्रकरणे स्थानिक तहसीलदार यांच्यासमोर मामलेदार ॲक्ट अन्वये चालू असतात या प्रकरणी तहसीलदार हे समक्ष स्थळ निरीक्षण करण्यासाठी त्या त्या गावांमध्ये भेटी देतात.त्यावेळी स्थळ पंचनामा केला जातो.तो चलचित्रणाच्या माध्यमातून करण्यात यावा अशी महत्वपूर्ण मागणी काँग्रेचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी नुकतीच केली आहे.
महसूल विभागाने या ज्वलंत प्रश्नावर महाराष्ट्रात काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास रस्ता खटल्या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी पारदर्शकता वाढेल-नितीन शिंदे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी.
महसूल विभागात शेतकऱ्यांचे अनेक दावे वर्षानुवर्षे सुरु असतात त्यात त्यांना न्याय मिळविण्यासाठी मोठे दिव्य करावे लागत आहे.अनेक दावे तहसीलदार यांच्या निर्देशानुसार चलचित्रणाच्या साहाय्याने होत नाही.(इंन कॅमेरा).त्या ऐवजी महसूल विभागातील कर्मचारी अथवा कारकून हे त्यांना जे पाहिजे तसा व परिस्थितीचा विपर्यास करून हस्तलिखित पंचनामे तयार करतात.कधीकधी ते वस्तुस्थितीला सोडून असतात तक्रारदारच्या तक्रारी विसंगत पंचनामे होत असल्यामुळे रस्ता केस प्रकरणी अनेक वाद वाढत चालले आहेत. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालून सदर पंचनामे हे ईन कॅमेरा करण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे.
महसूल विभागाने या ज्वलंत प्रश्नावर महाराष्ट्रात काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास रस्ता केस प्रकरणी निर्णय घेण्यासाठी पारदर्शकता वाढेल व असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य व कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. या संबंधी नितीन शिंदे यांनी महसूल मंत्र्यांकडे सविस्तर निवेदन दिले आहे