जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू व शालेय हॉकी स्पर्धेस गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रारंभ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

अहमदनगर येथील जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू व शालेय हॉकी स्पर्धेचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते आज रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य नूर शेख जिल्हयातून आलेले सर्व खेळाडु, प्रशिक्षक उपस्थित होते.
दोन्ही स्पर्धेकरीता जिल्हयातून एकूण २५ संघ सहभागी झालेले आहे.सदर स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलमध्ये (दि.) ६ सप्टेंबर पर्यंत चालणार असुन जिल्हास्तरीय नेहरू हॉकी स्पर्धे पाठोपाठ शालेय हॉकी स्पर्धाही गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर होणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, कपिल वाघ, बास्केटबॉल प्रशिक्षक सजंय ईटकर, क्रिकेट प्रशिक्षक रिजवान पठाण हाउस मास्टर्स प्रकाश भुजबळ, उत्तम सोनवणे, सुभाष वाणी आदी परीश्रम घेत आहेत. स्पर्धेचे पंच म्हणुन अकबर खान, अमन शेख, जाकिरयार खान, राहुल लिंगायत आदी काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close