जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु,नोंदणी करण्याचे पालिकेचे आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगांव नगरपरिषद,दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानंतर्गत शहरी फेरीवाल्यांना सहाय्य या उपांगाच्या अमलबजावणी करिता शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या देखरेखीखाली शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे आहे. समितीच्या मान्यतेने कोपरगांव शहरातील स्थिर, फिरते व तात्पूरते फेरीवाल्यांचे दिनांक ०३ सप्टेंबर पासून सर्वेक्षण सुरु करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जनशक्ती न्युजला दिली आहे.राज्य शासनाने पथ विक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथ विक्री विनियम योजना मंजूर केली आहे त्या अनुशंगाने कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील शहरातील स्थिर, फिरते व तात्पूरते पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण मोबाईल अॅपद्वारे करण्यात येत आहे. या साठी ठाणे येथील सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित या बाह्य संसाधन संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.या बाबतचा सर्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे.सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उप मुख्याधिकारी सुनिल गोर्डे,दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका शहर अभियान कक्षातील व्यवस्थापक महारुद्र गालट,रामनाथ जाधव, को.न.प.चे करनिर्धारण अधिकारी योगेश खैरे, स्वच्छता निरीक्षक सुनिल आरणे,संसाधन संस्थेचे सौरभ पांडे आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.या वेळी अध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की,वेळी शहरातील फेरीवाल्यांनी सर्वेक्षण करणाऱ्यास सहकार्य करावे, सर्वेक्षणा दरम्यान शासन निकषानूसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी स्वतःचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र अर्थात (डोमेसाईल सर्टिफिकेट), रेशनकार्ड तसेच विविध प्रवर्गानुसार लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, विधवा असल्यास (पतीचे मृत्यू प्रमाणपत्र), परित्यक्ता / घटसस्पोटीत असल्यास घटस्फोट झाल्याचे प्रमाणीकरण कागदपत्र या सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती सर्वेक्षण करतेवेळी सादर करावयाच्या आहेत. सदरील कागदपत्रे तात्काळ तयार ठेवावीत. तसेच आपल्या आधारकार्डशी आपला मोबईल नंबर जोडणे अत्यावश्यक आहे. फेरीवाल्यांनी आपल्या आधारकार्डशी आपला मोबईल नंबर जोडला नसल्यास तो तात्काळ जोडून घ्यावा. अन्यथा सदर व्यक्तीची नोंदणी करणे शक्य होणार नाही. याची सर्व फेरीवाल्यांनी गांभीर्याने नोंद घावी असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close