निवडणूक
कोपरगावात छाननीत एवढे अर्ज बाद !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज छाननी प्रक्रीयेत उमेदवारी दाखल एकुण ९७५ अर्जा पैकी ९६३ अर्ज वैध झाले असून १२ अर्ज बाद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.छाननी प्रकियेच्या वेळी राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे याही उपस्थित होत्या.
कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी नंतर शुक्रवार दि.०१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता निवडणूक प्रक्रियेतील समाविष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तसेच सोमवारी ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी संपन्न होत आहे तर मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.आज आलेल्या ९७५ अर्जाची छाननी २९ ग्रामपंचायतींच्या इच्छुक उमेदवारांच्या साक्षीने संपन्न झाली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकुण ९७५ दाखल अर्जाची छाननी आज संपन्न झाली त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.त्यात आधी प्राप्त अर्ज,त्यानंतर वैध अर्ज व त्यानंतर अवैध अर्जाची तिहेरी आकडेवारी दर्शवली आहे.
या ग्रामपंचायतीत उक्कडगाव (प्राप्त अर्ज -३८-३८-००) , तिळवणी-(२१-२१-००), अंजनापुर-(२८-२७-०१), घारी-(३४-३४-००), मनेगाव-(२५-२५-००), मळेगाव थडी-(३६-३६-००), सांगवी भुसार-(३२-३१-०१), वेळापूर-(३२-३१-०१),जेऊर पाटोदा-(३५-३४-०१), काकडी-(३७-३७-००),नाटेगाव-(२१-२१-००), कासली-( २५-२५-००), ओगदी-(२२-२२-००), आंचलगाव-(२३-२२-०१),कोळगाव थडी-(३६-३६-००), मायगाव देवी-(२७-२७-००), हिंगणी-(२७-२७-००), रवंदे-( २७-२६-०१), संवत्सर-(११६-११६-००), देर्डे चांदवड-(२०-१९-०१), मढी खुर्द-(३०-३०–००), मढी बुद्रुक-(३३-३२-०१), धोंडेवाडी-(३१-३१-००), सोनारी-( २१-२१-००), आपेगाव-(३४-३४-००), येसगाव-(३६-३४-०२), टाकळी-(३५-३४-०१), कोकमठाण-(५८-५८-००),जेऊर कुंभारी-(३५-३४-०१) आदी प्रमाणे प्राप्त झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी नंतर शुक्रवार दि.०१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता निवडणूक प्रक्रियेतील समाविष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तसेच सोमवारी ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ०४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ०३ वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.मतदान शुक्रवारी १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत राहणार आहे.
मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होणार असल्याची माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत .