जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..यांची किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांना संघटीत करून ४० वर्षे जुनी परंपरा असलेल्या कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र ट्रेडिंग कंपनीचे संचालक राजकुमार बंब यांची निवड झाल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी जाहीर केले आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशन हि संस्था कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे हातात हात घालून किराणा व्यापाऱ्यांना होणाऱ्या भेसळ प्रतिबंधक कायदा,वजन मापे,तराजू काटा कायदा,सेल्स टॅक्स,जी.एस.टी.यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे.तसेच मॉल संस्कृतीचा किराणा व्यापारावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाला सहकार्य करणार आहेत-राजकुमार बंब,नूतन अध्यक्ष.

नूतन अध्यक्ष बंब हे राजेंद्र ट्रेडिंग कंपनी या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात परीचीत असलेल्या फर्मचे संचालक आहेत.चांदवड येथील नेमीचंद जैन या शिक्षण संस्थेचे विश्वस्त आहेत.तसेच कोपरगावातील जैन ओसवाल समाजाचे प्रमुख असून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष आहेत.तसेच ते विविध सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतात.

कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष कै.मोहनलाल झंवर यांचे निधनाने रिक्त झालेल्या जागेवर हि निवड करण्यात आली आहे. लवकरच कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनची विस्तारित कार्यकारिणी तयार करण्यात येणार असून या कार्यकारिणीत युवकांना देखील स्थान देण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष बंब यांनी या निवडी प्रसंगी सांगितले आहे.

राजकुमार बंब यांचे कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल कोपरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक अरविंद भन्साळी व संजय भन्साळी तसेच किराणा व्यापारी चांगदेव शिरोडे,गुलशन होडे,महावीर सोनी तसेच व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,सचिव प्रदीप साखरे, राम थोरे,केशव भवर,बाळासाहेब कुर्लेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close