कोपरगाव तालुकानिवडणूक
भोजडे उपसरपंच पदाची निवड संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भोजडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे वाल्मिक शंकर सिनगर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संग्राम बोर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
भोजडे ग्रामपंचायती उपसरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक नुकतीच सरपंच रतनबाई सिनगर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी उपसरपंच पदासाठी काळे गटाचे वाल्मिक सिनगर यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना उपसरपंच जाहीर केले आहे.
भोजडे ग्रामपंचायती उपसरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक नुकतीच सरपंच रतनबाई सिनगर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी उपसरपंच पदासाठी काळे गटाचे वाल्मिक शंकर सिनगर यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामविकास अधिकारी संग्राम बोर्डे यांनी वाल्मिक शंकर सिनगर यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर केली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,दत्तात्रय सिनगर,दत्तात्रय घनघाव,अनिल धट,किरण आहेर,विक्रम सिनगर,पवन सिनगर, रंगनाथ सिनगर,संतोष सिनगर,फारुख पटेल,बाळासाहेब मंचरे,धोंडीराम धट,संजय सिनगर,मिथुन गायकवाड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच वाल्मिक सिनगर यांचे माजी आ.अशोक काळे, कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल वाल्मिक शंकर सिनगर यांनी सर्व सदस्यांचे भार मानले असून भोजडेच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेवून आ. काळे यांनी आपल्यावर विश्वासाने टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू अशी ग्वाही दिली.
उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित उपसरपंच वाल्मिक सिनगर यांनी आ. काळे यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेवून आभार मानले.