जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राजकारण्यांनी निळवंडेचा केवळ साठवण तलाव बनवला होता-अड्.काळे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गत पन्नास वर्षाहून अधिक काळ प्रलम्बीत असलेला व उत्तर नगर जिल्हयातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प हा जिल्ह्यातील राजकारण्यांनी केवळ साठवण तलाव बनवून आपला व आपल्या कारखान्यांचा स्वार्थ साधण्याचे काम सुरु ठेवले होते.मात्र निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे हा प्रश्न धसास लागला असून आता हे सिंचनाचे पाणी कोणीही अडवू शकणार नाही असा विश्वास प्रसिद्ध वकील व युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी जवळके येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

वीज कंपन्या सरकारकडून चोवीस तासाचे वीज बिल आकारात असून त्यातील पन्नास टाक्यांची हिस्सा म्हणून सरकार साडे तीन हजार कोटींचा भरणा महावितरण कंपनीला करत असताना हि कंपनी केवळ चोवीस तासातील केवळ आठ तास व तीही रात्री वीज देऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहे.या उलट शेतकरीच महावितरण कंपनीकडून घेणे कसा लागतो याचा जाहीर हिशेबच सांगून टाकला.व वीज बिलापोटी व विद्युत रोहित्र जळाल्यास एक रुपयांची वर्गणी देऊ नका-अड्,अजित काळे

जवळके येथे अण्णासाहेब शिंदे व जहिर सय्यद यांच्या साई समीक्षा व ओम साई राम मिल्क सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त विक्रमी दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांचा सत्कार अड्.अजित काळे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक मयूर टेमगिरे हे होते.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे,काशिनाथ शिंदे,भिवराज शिंदे,माधवराव गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,गोरखनाथ शिंदे,सोपान थोरात,सोमनाथ दरंदले,कौसर सय्यद,विश्वनाथ शिंदे,बाबुराव थोरात,लक्ष्मण थोरात,प्रभाकर गोसावी,दत्तात्रय गोसावी,नवनाथ शिरोळे,दगडू पाटील रहाणे आदी मान्यवरांसह दूध उत्पादक बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेली पुढे बोलताना ते म्हणाले की,”हा प्रकल्प उत्तर नगर जिल्ह्यातील प्रवरा व गोदाकाठच्या राजकीय नेत्यांनी खूप अडचणीत आणून ठेवला होता.व त्याचे कालवे होणार नाही याचीच तजवीज करून ठेवली होती.मात्र कालवा कृती समितीने याबाबत केंद्र सरकारच्या चौदा मान्यता दिल्लीत पाठपुरावा करून व उर्वरित तीन मान्यता उच्च न्यायालयाचे मार्फत मिळवल्या आहेत.या शिवाय रस्त्यावरची लढाई जिंकली आहे.काम पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सरकारकडून उच्च न्यायालयात मिळवले आहे.त्यामुळे आगामी एक ते दीड वर्षात हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात दिसणार आहे.आता हे पाणी मिळणार म्हटल्यावर काहींच्या पोटात पोटशूळ उठला होता.व हे पाणी लाभक्षेत्राच्या बाहेर नेण्याचे षडयंत्र रचले होते.मात्र त्याला कृती समितीने चोख उत्तर दिले आहे.त्यासाठी आम्ही कायम पूर्ण क्षमतेने कृती समितीच्या पाठीशी उभे राहणार आहे.व जेथे-जेथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल तेथे शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.व शेतकऱ्यांच्या याचिका आपण विनामूल्य लढवत असल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले आहे.त्यावेली शेतकऱ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला आहे.त्यावेळी त्यांनी महावितरण कंपनी कशी शेतकऱ्यांची विजबिलाबाबत लुबाडणूक करत आहे.ते सोदाहरणासहित स्पष्ट केले व वीज बिल शेतकऱ्यांनी गरजेचे नाही.कारण वीज कंपन्या सरकारकडून चोवीस तासाचे वीज बिल आकारात असून त्यातील पन्नास टाक्यांची हिस्सा म्हणून सरकार साडे तीन हजार कोटींचा भरणा महावितरण कंपनीला करत असताना हि कंपनी केवळ चोवीस तासातील केवळ आठ तास व तीही रात्री वीज देऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहे.या उलट शेतकरीच महावितरण कंपनीकडून घेणे कसा लागतो याचा जाहीर हिशेबच सांगून टाकला.व वीज बिलापोटी व विद्युत रोहित्र जळाल्यास एक रुपयांची वर्गणी देऊ नका असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाड्याचा हवाला देऊन असे आवाहन केले आहे.त्यावेळी सरकार हमीभावाची कशी फसवणूक करीत आहेत.ऊस भावात साखर कारखानदार कशी लूट करीत आहेत याचे अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले आहे.

या वेळी पत्रकार नानासाहेब जवरे,कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.या वेळी जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांचा कुलर,पाच पोशाख,किटली,कोयता,विळा,शाल,श्रीफळ,हार,दीपावली फराळ देऊन अड्.अजित काळे यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले आहे.त्यावेळी सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

उपस्थितांचे पाहुण्यांचे स्वागत काशिनाथ शिंदे,अण्णासाहेब शिंदे व जहिर सय्यद,भिवराज शिंदे यांनी केले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी तर उपस्थितांचे आभार कौसर सय्यद यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close