जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात १३.३४ लाखांचा ऐवज घेऊन आरोपी फरार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील गोकुलनागरी या ठिकाणी असलेल्या अश्वमेध ऍग्रोटेक ली.कंपनीत नोकरीस असलेला मात्र कोणतेही करण न देता आपल्या ताब्यातील होंडा कंपनीची कार व लेव्हीनो कंपनीचा लॅपटॉप,कर्मचारी नेमणुकीची नूक्ती घेऊन आरोपी विक्री प्रतिनिधी अजय प्रभाकर गंपावार वय-(४४) रा.बी.के.नगर नागपूर हा वारंवार मागणी करूनही ताब्यातील वस्तू न देता फरार झाला आहे.त्यामुळे कंपनी संचालक डॉ.ज्ञानेश्वर रामनाथ वाघचौरे वय-४८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अश्वमेध कंपनीत कामावर असताना न सांगता आपल्या ताब्यातील १३ लाख २४ हजार रुपये किंमतीच्या वस्तु त्यात एक लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप,एमएच-१७-बी.एक्स.-२१७७ होंडा कंपनीची कार,मोबाईल सिम कार्ड ८४११८८७०२१ असे त्यास कंपनीने काढुन टाकलेनंतर कंपनीस परत न करता स्वता:चे फायदयाकरीता घेवुन गेला आहे

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांची स्वतः स्थापन केलेली अश्वमेध ऍग्रो केमिकल्स नावाची गोकुळनगरी कॉम्प्लेक्स या ठिकाणी कार्यालय असलेली कंपनी आहे.त्यांच्या कंपनीत निर्माण झालेला माल विक्रीसाठी त्यांनी अनेक विक्री प्रतिनिधी नेमलेले आहे.त्यांच्या ताब्यात कंपनीचा माल विक्रीसाठी विविध जिल्ह्यात विक्री प्रतिनिधी नेमलेले आहेत.ते कंपनीचा माल इतरत्र पोहोचवत असतात.व त्याची रक्कम हिशेब करून आणून देत असतात.त्यातील एक आरोपी प्रतिनिधी अजय गंपावार हा नागपूर येथील बी.के.नगर येथील राहिवाशी असून तो अनेक वर्षा पासून काम करतो.मात्र मार्च २०२० पासून आपल्या ताब्यातील १३ लाख २४ हजार रुपये किंमतीच्या वस्तु त्यात एक लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप,एमएच-१७-बी.एक्स.-२१७७ होंडा कंपनीची कार,मोबाईल सिम कार्ड ८४११८८७०२१ असे त्यास कंपनीने काढुन टाकलेनंतर कंपनीस परत न करता स्वता:चे फायदयाकरीता घेवुन गेला आहे तसेच कंपनीचे विक्री प्रतिनिधीचे सेल्स ऍ़ग्रीमेंट संदर्भातील व आरोपीस दिलेल्या नेमणुकीची कागदपत्रे असलेली कागदपत्रांची ऑफिसमध्ये ठेवलेली फाईल चोरुन नेली आहे वगैरे मााचे फिर्यादीवरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोपरगांव शहर पो.स्टे.गुरनं व कलम ७३८/२०२० भा.द.वि.क.३८१,४०८, प्रमाणे आरोपी अजय प्रभाकर गंपावार यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गादर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close