कोपरगाव तालुका
अवैध गोवंश जातीचे जनावरे पकडली,तीन आरोपी जेरबंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील येवला नाका या ठिकाणी आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञात गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या खबरी नुसार कोपरगाव शहर पोलिसानी टाकलेल्या धाडीत दोन पिकअप मध्ये अंदाजे ०३ लाख ६७ हजार रुपये किमतीची जनावरे अवैध रित्या वाहतूक करताना आढळल्याने पोलिसानी दोन वाहनासह तीन आरोपी दीपक शिवाजी निंबाळकर (वय-२५), रा.करंजी ता.निफाड,साजिद ईसा कुरेशी (वय-२८) रा.कागजीपुरा खुलताबाद,अकिब सत्तार कुरेशी (वय-१९) रा.आयेशा कॉलनी,कोपरगाव आदी तीन आरोपीना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत एक बातमी मिळाली असता त्यांनी गस्तीवर असलेल्या आपल्या पोलीस पथकाला तातडीने घटनास्थळी म्हणजेच येवला नाका या ठिकाणी पाठवले असताना मिळलेली खबर पक्की असल्याची खात्री झाली.त्या ठिकाणी दोन महिंद्रा पिकअप गाड्या उभ्या स्थितीत आढळल्या असून तीन आरोपीना अटक केली आहे.
कोपरगाव शहरात वर्तमान स्थितीत गायी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.त्यातच आज सकाळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत एक बातमी मिळाली असता त्यांनी गस्तीवर असलेल्या आपल्या पोलीस पथकाला तातडीने घटनास्थळी म्हणजेच येवला नाका या ठिकाणी पाठवले असताना मिळलेली खबर पक्की असल्याची खात्री झाली.त्या ठिकाणी दोन महिंद्रा पिकअप गाड्या उभ्या स्थितीत आढळल्या (क्रं.एम.एच.१५ ई.जी.००२४,व एम.एच.२० डी. ई.६०५४) व त्यात गोवंश जातीची साधारण तीन लाख ६७ हजार रुपये किमतीची जनावरे त्यात सहा मोठ्या गायी,मिळून आल्या घटनास्थळी पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी पशु वैद्यकीय अधिकारी श्रद्धा महादेव काटे यांना बोलावून घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली व सदरची जनावरे हि खाजगी वाहनात भरून ती कोकमठाण या ठिकाणच्या गोशाळेत रवानगी केली आहे.
सदर प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.७४०/२०२० भा.द.वि.कलम ४२९,भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागवण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ह) व महा.प्राणी संव.कायदा व सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(ब) व ९ प्रमाणे वरील तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.