जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहर शिवसेनेचे नूतन पदाधिकारी जाहीर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर प्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांनी कोपरगाव शहर शिवसेनेची जूनी कार्यकारीणी बरखास्त करून नवीन कार्यकारीणी नुकतीच जाहीर केली आहे.त्यात अनेकांना स्थान देण्यात आले आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बदनामी होईल असे वागू नका,शिवसेनेशी,पक्षप्रमुखांशी व आपल्या पदाशी प्रामाणिक राहा व पदावर राहून दुसऱ्या पक्षाचं काम करू नका,पदाचा मान राखा,पक्षाचं ध्येय,धोरण व विचार प्रत्येक घरात पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न करा-राजेंद्र झावरे,जिल्हा प्रमुख

कोपरगाव शहर शिवसेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथून रदबदली करण्यात आल्याने त्या जागी नवीन शहरप्रमुख म्हणून उपशहर प्रमुख कलविंदर दडियाल यांची सेनेचे वरिष्ठ सचिव खा.देसाई यांनी घोषणा केली होती.त्यानंतर आता दडियाल आपल्या संघटनेत नेमके कोणाकोणाला स्थान देणार याकडे शिवसेनेचे लक्ष लागून होते.दरम्यान त्यांनी आपल्या नवीन संघटनेत अनेक जुन्या माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे समर्थकांना संधी दिली असल्याचे दिसून आले आहे.त्यात उपशहरप्रमुख पदी विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे,गोपाल वैरागळ,गगन हाडा,भूषण पाटणकर,आकाश कानडे,शहर संघटक पदी बाळासाहेब साळूंके व नितीन राऊत,तर सहसंघटक पदी वैभव गिते,विभाग प्रमुख पदी विजय शिंदे,दिपक बरदे,जयेश हसवाल,समीर शेख,रफिक शेख,मयुर दळवी,सौरव गायकवाड,शैलेश वाघ,किरण गायकवाड आदींची निवड करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी एस.टी.कामगार सेनाप्रमुख भरत मोरे,विधानसभा संघटक अस्लम शेख,युवासेना सहसचिव सुनील तिवारी,रविंद्र सोमासे,युवानेते विक्रांत झावरे,योगेश मोरे,गोविंदा शिंदे,दशरथ सालकर विशाल झावरे,निशांत झावरे,इरफान शेख,मुन्ना मन्सूरी,वाल्मिक चिने,अक्षय नन्नवरे,अक्षय वाकचौरे,अजय शिंगाडे,सनी डहांके,भूषण वडांगळे,रितेश राऊत,रोहित बरदे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे,राखी विसपुते,अश्विनी होने,नगरसेविका वर्षा शिंगाडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.सूत्रसंचालन भरत मोरे तर आभार सपना मोरे यांनी मानले.

शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल म्हणाले की,”नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे.फक्त सामाजिक संकेतस्थळावर काम करणाऱ्या लोकांना पद द्यायचे नव्हते,खरे काम करणाऱ्यांना पदे दिलेली आहेत.शिवसेना समाज कारण करण्यासाठी आहे.पहिले काय होत ते विसरा व आता ही शिवसेना नवीन जोमाने काम करणार असून जो कोणी पक्षाच्या ध्येय- धोरणा विरोधात काम करेल त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल”.

भरत मोरे म्हणाले की, निर्मळ स्वच्छ मनाने काम करा,भविष्यात तुम्हाला जनतेत जाऊन अनेक मोठे पदे मिळतील, कोणाच्याही पाकिटावर न जगता आपला स्वाभिमान जिवंत ठेवून काम करा.शिवसेनेच्या नूतन पदाधिकारी नियुक्ती मुळे सर्व शिवसैनिकांना मध्ये उत्साह संचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close