आरोग्य
कोपरगावात दोघांचा मृत्यू,कोरोना रुग्ण वाढ सुरूच !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात काल ४७ रुग्ण वाढीचा उच्चान्क वाढून आज एक आरोग्य कर्मचारीं व कोकमठाण कारवाडी येथील द्रौपदाबाई विश्वनाथ वहाडणे (वय-७५ ) वर्ष असे दोघांचे निधन झाले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १०७ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ११ रुग्ण बाधित निघाले असून ०६ संशयित रुग्णांना घरी सोडून दिले आहे.नगर येथे तपासणीसाठी ३५ संशयितांचे अहवाल पाठवले आहे.नगर येथे काल पाठवलेल्या पैकी २६ बाधित तर खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात ०४ बाधित असे एकूण बाधितांची संख्या ४१ निष्पन्न झाली आहे.तपासणीत तर ९६ जण निरंक निघाल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २४ हजार ५९१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३५४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील २० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह आज सकाळी एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या २२ तर ग्रामीण भागात १९ असे तेवीस रुग्ण बाधित निघाले असून दोन खाजगी प्रयोग शाळेतील असे २५ बाधित रुग्ण असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचारी व गजानननगर येथील रहिवाशी राजेंद्र साबळे (वय-५९) यांचे व अन्य कोकमठाण कारवाडी येथील महिला द्रौपदाबाई वहाडणे हि महिला या दोघांचे निधन झाल्याची माहिती प्राप्त झाली असल्याने आता मृत्यू पावलेल्यांची संख्या वीस झाली आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे सराफ बाजार पुरुष वय-४७,येवला रोड पुरुष वय-३८,कर्मवीरनगर पूरुष वय-२७,रिद्धीसिद्धीनगर महिला वय-५०,मोहिनीराज नगर दोन पुरुष वय-६२,१४,लक्ष्मीनगर येथील चार बाधित त्यात एक मुलगा वय-१४ तर ३ महिला वय-३६,३५,२०,इशांतनगर एक पुरुष वय-३२ तर एक महिला वय-२७,धारणगाव रोड एक पुरुष वय-३०,भारत प्रेस रोड एक मुलगा वय-१५,तर एक महिला वय-१९,गांधीनगर येथील एक पुरुष वय-६५,राजपाल सोसायटी एक पुरुष वय-२१,श्रद्धानगर एक महिला वय-५७,इंगळें नगर येथील पुरुष वय-५६,स्वामीसमर्थ नगर पुरुष वय-५९,अण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळ तरुण वय-२९,खडकी पुरुष वय-३५ असे शहरात २२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
तर ग्रामीण भागात कोकमठाण येथे पुरुष वय-५७,६५,दोन महिला वय-३५,४५,शिंगणापूर महिला वय-३०,१३,येसगाव पुरुष वय-२७,वेस महिला वय-२४,संवत्सर पुरुष वय-५७,कोळपेवाडी पुरुष वय-७३,३०,सुरेगाव महिला वय-३६,१८,चास नळी पुरुष वय-२६,३७,५६,महिला वय-५६,खिर्डी गणेश पुरुष वय-५८,देर्डे चांदवड पुरुष वय-५८,असे एकूण १९ बाधित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १०९२ इतकी झाली आहे.त्यात १७१ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २० जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८३ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार ८१८ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १९ हजार २७२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २२.६७ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ९०१ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८२.५१ टक्के झाला आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.