कोपरगाव तालुका
कॅरम खेळण्यावरून हाणामारी,चौघांवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील संजयनगर या उपनगरात रविवार दि.६ ऑगष्ट रोजी सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास कॅरम खेळण्याच्या किरकोळ कारणावरून त्याच परिसरातील आरोपी अरबाज कुरेशी,असलम कुरेशी,सोहिल कुरेशी,अजीम (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी फिर्यादी संतोष रमेश साटोते (वय-३१) रा.सुभाषनगर यास पाण्याच्या टाकीजवळ अर्वाच्च शिवीगाळ करून,जीवे मारण्याची धमकी देऊन,हातातील दगडाच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात संजयनगर येथे पाण्याच्या टाकीजवळ काही तरुण कॅरम खेळात असताना त्यांच्यात किरकोळ आक्रनावरून बाचाबाची झाली,व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आहे.त्यात तेथे उपस्थित असलेले आरोपी अरबाज कुरेशी,असलम कुरेशी,सोहिल कुरेशी,अजीम (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी फिर्यादी संतोष रमेश साटोते (वय-३१) रा.सुभाषनगर यास अरबाज कुरेशी याने अर्वाच्च शिवीगाळ करत व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात संजयनगर येथे पाण्याच्या टाकीजवळ काही तरुण कॅरम खेळात असताना त्यांच्यात किरकोळ आक्रनावरून बाचाबाची झाली,व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आहे.त्यात तेथे उपस्थित असलेले आरोपी अरबाज कुरेशी,असलम कुरेशी,सोहिल कुरेशी,अजीम (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी फिर्यादी संतोष रमेश साटोते (वय-३१) रा.सुभाषनगर यास अरबाज कुरेशी याने अर्वाच्च शिवीगाळ करत व जीवे मारण्याची धमकी दिली तर आरोपी अस्लम कुरेशी याने हातातील दगडाने डोक्यात मारून फिर्यादी संतोष साटोते यास जखमी केले आहे.या प्रकरणी फिर्यादी संतोष साटोते याने कोपरगाव शहर पोलिसात धाव घेऊन वरील चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.नं.६४६/२०२०,भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे वरील चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आह.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.