कोपरगाव तालुका
राम मंदिर भूमिपूजन,कोपरगावात लाडू वाटप !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बहुप्रतीक्षित राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला आहे.भूमिपूजनाच्या निमित्तानं देशभरात आज उत्साहाचं वातावरण होतं.तर दुसरीकडे भाजपाच्या अनेक नेत्यांनी आपल्या घरांमध्येही प्रभू श्रीरामाचं पूजन केलं. भूमिपूजनाच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भजन गायल्याचं पाहायला मिळाल असताना कोपरगाव शहरात मात्र त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विश्वहिन्दु परिषद कोपरगाव शाखेच्या वतीने सुरक्षित अंतर पाळत वतीने पाळून नागरिकांना लाडुचे वाटप करण्यात आले आहे.
या कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरात घरोघरी जाऊन सदर लाडु वाटप करण्यात आले.यावेळी विजय जोशी,चेतन खुबाणी,चेतन राणे,गणेश शिंदे,सुरेश कंगूने आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी हे लाडू दोन-दोन च्या गटाने केले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.