जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आणखी तीन बाधित रुग्ण !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात अद्याप कोरोना बाधित रुग्ण थांबण्याचे नाव घेत नसून दि.२५ जुलै पाठवलेल्या २० जणांचे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून यात काले मळा येथील एक (वय-५२) वर्षीय इसम तर एक,(३०) वर्षीय तरुण कोरोना बाधित आले असून,आणखी तिसरा रुग्ण गांधीनगर येथील असून त्याचे वय-२९ वर्ष असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या शिवाय आणखी ५० नागरिकांचे अहवाल तपासणीसाठी नगर येथील प्रयोग शाळेत पाठवले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात कोरोना बाधित होऊन घरी परतणाऱ्या नागरिकांचे शहरात स्वागत होताना दिसत आहे.कोपरगावच्या कोरोना योध्या सुनिता एरंडे यांचे संभाजी चौक तेरा बंगले श्रध्दा पॅराडाईज काॅलनीतील नागरीक व महिलांनी जोरदार स्वागत करण्यात केले आहे.त्यांचे त्यांच्या शेजारी नागरिक व महिला यांनी पुष्पवृष्टी करून मनापासून स्वागत केले आहे.

कोपरंगाव शहरातील वीज मंडळाच्या पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका दवाखान्याचे एक डॉक्टर बाधित निघाल्यावर बाधित रुग्णांची मालिका संपण्याचे नाव घेताना दिसत नाही हि अद्याप सुरूच असून आहे.जण आज रोजी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.आता कोपरगाव शहर व तालुक्यात बाधितांची संख्या आता ३९ वर पोहचली आहे.अद्यापपर्यंत या साथीत कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेलेले आहेत.आता पढेगाव येथील एका रुग्णाची त्यात भर पडून ही संख्या ४६ वर गेली आहे.या घटनेने प्रशासन अजून सतर्क झाले आहे.व पोलिसानी आणखी कडक धोरण अवलंबले असून मुखपट्टी न बांधणाऱ्या बेताल नागरिकांवर कारवाईची संख्या वाढल्याच्या घटनांत वाढ झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी आता आणखी रुग्ण वाढ न होण्यासाठी सतर्क राहून प्रशासनास मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात कोरोना बाधित होऊन घरी परतणाऱ्या नागरिकांचे शहरात स्वागत होताना दिसत आहे.कोपरगावच्या कोरोना योध्या सुनिता एरंडे यांचे संभाजी चौक तेरा बंगले श्रध्दा पॅराडाईज काॅलनीतील नागरीक व महिलांनी जोरदार स्वागत करण्यात केले आहे.त्यांचे त्यांच्या शेजारी नागरिक व महिला यांनी पुष्पवृष्टी करून मनापासून स्वागत केले आहे.त्या शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय येथे कोरोना काळात अनेक रुग्णांची सेवा करताना सुनीता एरंडे या कोरोना बाधित झाल्या होत्या.त्यांना दि.१९ जुलै रोजी “आत्मा मालिक हॉस्पिटल कोरोना सेंटर” येथे उपचारार्थ भरती करण्यात आले होते.त्यांना कोरोनास पळवून लावण्यात यश आले आहे.आता त्या करोना मुक्त झाल्याने त्यांना आज सोडून देण्यात आले आहे.त्या आपल्या घरी परतत असताना त्यांचे सुरक्षित अंतराचे योग्य पालन करून पुष्पवृष्टी करून थाळीनाद व टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close