क्रीडा विभाग
…या संघाची थेट राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
गौतम पब्लिक स्कूलचा१४ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विजय मिळवून या संघाची थेट राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली असून हा संघ आगामी रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.याचबरोबर शालेय जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत गौतमच्या १४,१७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही संघ विजयी झाले असून या संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघांनीही जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.१४,१७ आणि १९ वयोगटांतील संघांनी विजय मिळवला असून या संघाला विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत १५ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे १४ वर्षांखालील मुलींच्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या आहे.या अटीतटीच्या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींनी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.गौतमच्या संघाने पुणे ग्रामीण विरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात १५/४ अशी आघाडी घेत विजय मिळवला आहे.उपांत्य सामन्यात सोलापूर ग्रामीण संघाविरुद्ध गौतमच्या संघाने २५/५ असा एकतर्फी विजय मिळवून थेट अंतिम फेरीत धडक मारली.अंतिम लढतीत अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीण यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात,गौतमच्या संघाने २५/१६ अशी मात देत विभागीय स्पर्धेत विजय मिळवला.तब्बल २० वर्षांनंतर कोपरगाव तालुक्याच्या मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत खेळणार आहे.नोव्हेंबरमध्ये रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत गौतमचा संघ पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दरम्यान गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघांनीही जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.१४,१७ आणि १९ वयोगटांतील संघांनी विजय मिळवला असून या संघाला विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे.१४ वयोगटाच्या अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूलने सोनईच्या यश अकॅडमीचा ३/० असा पराभव केला.तर १७ वयोगटातील गौतमच्या संघाने सोनईच्या यश अकॅडमीविरुद्ध ३/० असा लक्षवेधी विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.तसेच १९ वर्षांखालील गटात संगमनेर कॉलेज विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात गौतमच्या खेळाडूंनी नियोजनबद्ध आणि आक्रमक खेळ करत ३-० फरकाने विजय मिळवला आहे.
गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,संथेचे निरीक्षक नारायण बारेप्राचार्य नूर शेख, यांनी व्हॉलीबॉल संघाचे अभिनंदन केले आहे.



