शैक्षणिक
…या शाळेच्या नाटकास पहिला क्रमांक !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात,आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या,”आंतराळातील मानवीवस्ती” या नाटकास पहिला क्रमांक मिळाला आहे.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण)व जिल्हा परिषद यांनी अहिल्यानगर येथे या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव आयोजन केले होते.या नाटकाची आता विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

या नाटकात तेजस्विनी मोरे,तन्वी शिंदे,समिधा देवरे,शाल्वी कोष्टी,मिताली पाडवी,सात्वित भागवत व आराध्य दिघे या विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या.या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
दरम्यान याबाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हणाले,”या स्पर्धेत आंतराळातील मानवी वस्ती हा वेगळा विषय घेऊन नाटक सादर करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपआपल्या भूमिका प्रभावीपणे सादर केल्या.त्यासाठी त्यांनी कसुन रंगीत तालीम केली होती.त्याचे फलीत म्हणून या नाटकास पहिला क्रमांक मिळाला आहे.संस्थेच्या दृष्टीने हि भुषणावह बाब आहे.
या नाटकासाठी आत्मा मालिक सांस्कृतिक विभाग व्यवस्थापक आत्मदर्शन बागडे यांचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थ्यांचे गटशिक्षण अधिकारी शबाना शेख,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, प्राचार्य निरंजन डांगे,गटशिक्षणाधिकार पिंकी वाजे,विज्ञान तालुका अध्यक्ष योगेश सावळा यांनी अभिनंदन केले आहे.



