जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…हा कारखाना पहिली उचल रु.३हजार २००ने देणार-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामाची पहिली उचल ०३ हजार २०९ रुपये प्रतिटन देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आज सकळी आयोजित एका कार्यक्रमात केली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७२ व्या गळीत हंगाम शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे,पुष्पाताई काळे,अध्यक्ष आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष दिनार कुदळे,संचालक मंडळ,मान्यवर व पदाधिकारी.

राज्यातील शेतकरी संघटनांनी उसाला प्रतिटन दर ०७ हजार ५०० ते ०५ हजार ५०० रुपयांचा मागितला असताना ज्यांच्याकडून अपेक्षा करावयाची त्यांनीच केवळ प्रतिटन पहिली उचल ०३ हजार २०० देऊन ऊस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे मानले जात असून यानंतर सहकार महर्षी कोल्हे कारखाना वेगळे दिवे लावणार नसल्याचे उघड असल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.

     कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या ७२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे व त्यांच्या धर्मपत्नी पुष्पाताई काळे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

  “ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी पहिली उचल जरी प्र.मे.टन रुपये ३ हजार २०० देण्यात येणार असली तरी १ ते १५ जानेवारी दरम्यान गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन रुपये १०० तर १५ ते ३१ जानेवारी दरम्यान गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन रुपये १५०,१ ते १५ फेब्रुवारी दरम्यान गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन रुपये २०० आणि त्यानंतर गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन रुपये २५० विशेष अनुदान देण्यात येणार आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना,गौतमनगर.

   सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे,तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र जाधव,पद्माकांत कुदळे,बाळासाहेब कदम,नारायण मांजरे,ज्ञानदेव मांजरे,बाबासाहेब कोते,संभाजी काळे,सोमनाथ चांदगुडे,बाळासाहेब जपे,संचालक प्रवीण शिंदे,सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम,दिलीप बोरनारे,डॉ.मच्छिंद्र बर्डे, राजेंद्र घुमरे,शंकरराव चव्हाण,सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले,राहुल रोहमारे,अनिल कदम,अशोक मवाळ,सुनील मांजरे,मनोज जगझाप,वसंतराव आभाळे,प्रशांत घुले, वत्सलाबाई जाधव,इंदूबाई शिंदे,गंगाधर औताडे,श्रावण आसने,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलत मोरे,गौतम केनचे कार्यकारी संचालक सुभाष गवळी,कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,कारखान्याचे महाव्यवस्थापक सुनिल कोल्हे,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे, सचिव बाबा सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ,मुख्य अभियंता निवृत्ती गांगुर्डे,मुख्य रसायन तज्ञ सुर्यकांत ताकवणे,शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे,उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक, पदाधिकाऱ्यांसह सभासद,शेतकरी,कर्मचारी, व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राज्य शासनाने जरी १५ ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरु करण्यास सांगितले असले तरी परिस्थिती अनुकूल नव्हती.ऊसाची वाढ न झाल्यामुळे अपेक्षित रिकव्हरी मिळणार नाही त्यामुळे शेतकरी आणि कारखाना दोघांचेही नुकसान होणार असल्यामुळे ऊस अधिक परीपक्व व्हावा व गळीत हंगाम १५ ऑक्टोबर ऐवजी १५ नोव्हेंबर नंतरच सुरु व्हावा असे वाटत होते.परंतु पावसाच्या बाबतीत हवामान विभागाकडून देण्यात येणारी माहिती आणि वाढलेली उष्णता पाहता पुढे आणखी अडचणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे १५ ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरु करण्याचा निर्णय योग्य वाटतो.चालूवर्षी एल निनोचे सावट असल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात फक्त जुलै महिन्यातच पाऊस पडला याउलट मागील वर्षी मे पासून नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत होता.त्यामुळे मागच्या आणि चालू हंगामात परस्पर विरोधी परिस्थिती आहे. राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.दुष्काळग्रस्त तालुक्यांत ट्रिगर-१ लागु झाला असून दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर योग्य त्या उपाय योजना देखील तात्काळ सुरु करण्यात आल्या आहेत.त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा.पाण्याची उपलब्धता लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.यावर्षी कमी वाढ झालेल्या उसाचे खोडवे राखून पुढील वर्षी गाळपासाठी पीक उपलब्ध होईल, याकडे लक्ष द्यावे.नवीन उसाची लागवड करून कमी पाण्याचा वापर करावा व अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा.ऊस पिक वाचवण्यासाठी शेतात आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करून ऊस पाचटाचे आच्छादन करावे,ए-आय तंत्रज्ञानाचा आधार घेवून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर यांचा वापर वाढवावा असे आवाहन केले.गोदावरी कालव्यांचे दोन आवर्तन देण्यात येणार असल्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुतोवाच केलेले असले तरी प्रत्यक्षात पुढील परिस्थिती कशी असेल हे आज सांगता येणार नाही.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाव्यवस्थापक सुनिल कोल्हे यांनी केले तर उपाध्यक्ष दिनार कुदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close