गुन्हे विषयक
तालुका पोलिसांनी ०४ सराईत गुन्हेगार केले जेरबंद!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
विरार,मुंबई येथील साईभक्त अजित तोरसेकर व त्यांच्या पत्नीची दि.३० एप्रिल रोजी भर रस्त्यात बंदूक सदृश वस्तूचा धाक दाखवून लूट केल्या प्रकरणातील सराईत आरोपी काळु उर्फ संतोष शामराव दळवी यांचेसह त्याचे साथीदार राजु संजय बर्डे,किरण बाळु जाधव दोघे रा.देर्डे-चांदवड व अमोल राजु राजपुत रा.कोळपेवाडी या त्याच्या साथीदारांना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

सदर गुन्हयातील आरोपी काळु उर्फ संतोष शामराव दळवी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द एकूण चार अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.तर या शिवाय दुसरा आरोपी राजु संजय बर्डे याचेविरुध्द पोलीस ठाणे गु.र.नं.व कलम १ कोपरगाव तालुका पोलिस ठाणे.गु. र.नं.२२१/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,५११,३४ प्रमाणे गुन्हे असल्याचे उघड झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,” दि.३० एप्रिल २०२६ रोजी मुंबई विरार येथील साईभक्त अजित बुधाजी तोरसकर (वय-२८) वर्ष धंदा नोकरी रा.रुम नं. ४०६ चिंतामणी बिल्डींग नं.३ गोविदनगर गांधीचौक,पुलपाडा रोड,विरार पुर्व हे आपली पत्नीला घेऊन शिर्डी येथील साईबाबा समाधीचे दर्शनाला आपल्या दुचाकीवरून निघाले होते.दरम्यान त्यांचेवर पाळत ठेऊन सिन्नर तालुक्यातील वावी येथून त्यांचे पाठिमागुन एका काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकल वरुन आलेल्या तिन अनोळखी चोरट्यांनी त्यांचे पत्नीची पाठीवरील बॅग ओढुन त्यांच्या दुचाकीस अडथळा करुन त्यांना थांबण्यास भाग पाडले होते.त्यांची गाडी थांबल्या नंतर त्यांना मोटार सायकल आडवी उभी करुन बंदुकी सारख्या काही तरी वस्तुचा व चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडे असलेले ओपो व आयफोन कंपनीचे २ मोबाईल फोन व एक सोन्याची लेडीज चैन जबरीने चोरुन मोटार सायकलची चावी घेऊन पोबारा केला होता.

सदर साईभक्त फिर्यादी अजित तोरसेकर यांचे दुचाकीचा वावी ता.सिन्नर येथुन पाठलाग करुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक करून त्यांचे कडुन गुन्हयात त्यांनी जबरीने चोरुन नेलेले दोन मोबाईल फोन ओपो व आयफोन कंपनीचे हस्तगत करण्यात आलेले आहे.सदर आरोपी यांनी फिर्यादी यांचा ऐवज चोरट्यांच्या दुचाकीसह जप्त केला आहे.
दरम्यान फिर्यादीवरुन कोपरगाव ता पो स्टेशन गुन्हा रजी नंबर १६४/२०२६भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सुरु केला असता तपासादरम्यान काही तांत्रीक पुरावे आढळले होते.त्या पुराव्याचे आधारे त्यांनी संशयित आरोपी महेश सिताराम चंदनशिव यास ताब्यात घेऊन त्याला पोलिसी हिसका दाखवला असता त्याने सदरचा मोबाईल हा त्याचा जोडीदार काळु उर्फ संतोष शामराव दळवी रा.हिंगणी याने दिला होता.मात्र तो चालत नसल्याने तो त्यास परत दिला असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.त्यावरुन सदर इसम नामे काळु उर्फ संतोष शामराव दळवी हा दि.०१ ऑक्टोबर २०२६ रोजी हिंगणी येथे येणार असल्याची माहिती तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती.त्यावरुन पोलिसांनी हिंगणी-देर्डे-चांदवड रस्त्यावर सापळा लावुन त्यास पो.हे.कॉ.दहिफळे,पो.कॉ.वाघ,पो.कॉ.बबन तमनर यांचे पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यानंतर पोलिसी हिसका दाखवला असता त्याने त्याचे साथीदार राजु संजय बर्डे (वय-२५) रा.देर्डे चांदवड,किरण बाळु जाधव (वय-२७)दोघे रा.देर्डे-चांदवड व अमोल राजु राजपुत (वय-२२ )रा.कोळपेवाडी
ता.कोपरगाव अशांनी मिळुन सदर साईभक्त फिर्यादी अजित तोरसेकर यांचे दुचाकीचा वावी ता.सिन्नर येथुन पाठलाग करुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक करून त्यांचे कडुन गुन्हयात त्यांनी जबरीने चोरुन नेलेले दोन मोबाईल फोन ओपो व आयफोन कंपनीचे हस्तगत करण्यात आलेले आहे.सदर आरोपी यांनी फिर्यादी यांचा ऐवज चोरट्यांच्या दुचाकीसह जप्त केला आहे.

सदर गुन्हयातील आरोपी काळु उर्फ संतोष शामराव दळवी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द एकूण चार अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.तर या शिवाय दुसरा आरोपी राजु संजय बर्डे याचेविरुध्द पोलीस ठाणे गु.र.नं.व कलम १ कोपरगाव तालुका पोलिस ठाणे.गु. र.नं.२२१/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,५११,३४ प्रमाणे गुन्हे असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी पोलिस अधीक्षक,अप्पर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.



