शैक्षणिक
दिल्लीतील जागतिक केटलबेल स्पर्धेत…या संकुलाची कामगिरी!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
दिल्ली येथे ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित आय.यू.के.एल.वर्ल्ड केटलबेल चॅम्पियनशिप २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शिर्डी येथील श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण,४ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १२ पदके जिंकून लक्षवेधी कामगिरी केली आहे.या जागतिक स्पर्धेत यजमान भारतासह रशिया,अमेरिका,थायलंड,ऑस्ट्रेलिया,उझबेकिस्तान, इंग्लंड,मंगोलिया,फ्रान्स,पोलंड,दक्षिण कोरिया आणि सिंगापूर अशा एकूण १२ देशांतील ३०२ खेळाडूंनी सहभाग घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान या स्पर्धेत पदक विजेते खेळाडू व प्राप्त पदके पुढे दर्शवले आहेत.ओंकार कोल्हे-२ सुवर्ण आणि १ रौप्यपदक,अनिकेत पायमोडे-१ सुवर्ण आणि १ रौप्यपदक,साई चौधरी-१ सुवर्णपदक,श्रुती उपाध्ये -१ सुवर्णपदक,हुजेब मनियार-१ रौप्यपदक,आराध्या ढेंबरे-१ रौप्यपदक,तुषार साकट-१ कांस्यपदक,पवन बोधके-१ कांस्यपदक,सुनील जाधव -१,कांस्यपदक या सुवर्ण कामगिरी केली आहे.
‘आय.यू.के.एल.वर्ल्ड केटलबेल चॅम्पियनशिप २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असून, ही प्रतिष्ठित स्पर्धा सध्या नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे.या जागतिक स्पर्धेत विविध देशांतील अव्वल केटलबेलपटू सहभाग घेत असून,भारताला पहिल्यांदाच या मोठ्या क्रीडा महोत्सवाचे यजमानपद भूषवण्याचा मान मिळाला आहे.याशिवाय, या वर्षातील ‘सेपरेट डिसिप्लिन्स’ची वर्ल्ड चॅम्पियनशिप १४ ते १८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान रिगा,लात्व्हिया येथे होणार आहे.या स्पर्धात शिर्डी येथील श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या खेळाडूंनी मोठी कामगिरी केली आहे.
दरम्यान या स्पर्धेत पदक विजेते खेळाडू व प्राप्त पदके पुढे दर्शवले आहेत.ओंकार कोल्हे-२ सुवर्ण आणि १ रौप्यपदक,अनिकेत पायमोडे-१ सुवर्ण आणि १ रौप्यपदक,साई चौधरी-१ सुवर्णपदक,श्रुती उपाध्ये -१ सुवर्णपदक,हुजेब मनियार-१ रौप्यपदक,आराध्या ढेंबरे-१ रौप्यपदक,तुषार साकट-१ कांस्यपदक,पवन बोधके-१ कांस्यपदक,सुनील जाधव -१,कांस्यपदक या सुवर्ण कामगिरीसोबतच संस्थानचे क्रीडा संचालक डॉ.विक्रम सातपुते यांनी इंटरनॅशनल युनियन ऑफ केटलबेल लिफ्टिंग सर्टिफिकेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
दरम्यान खेळाडूंच्या या यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे,संदीप भोसले यांचेसह सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी संस्थानचे क्रीडा संचालक व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.



