गुन्हे विषयक
शेतकऱ्यांच्या वीज पंपातील तांब्याच्या तारांची चोरी,शेतकरी हैराण!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम ऐन भरात असताना चोरट्यांनी संधी साधत 07 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या आतील तांब्याच्या तारांची चोरी करण्याचा सपाटा लावला असल्याचे उघड झाल्याने सुरेगाव हद्दीतील शेतकरी धास्तावले गेले आहे.त्यांची उभी पिके जाळून जात असल्याचे दिसून येत आहे.याबाबत कोपरगाव तालुका पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यानी आमचे प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

सुरेगाव आणि वेळापूर हद्दीतील शेतात लक्ष ठेऊन त्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिला शेतकरी सुमनबाई मारुती गुजर (10 एच.पी.),अशोक रामभाऊ आहेर (साडेसात एच.पी.),कैलास मनोहर मोकळ,( पाच एच.पी.), रवींद्र वसंत मोकळ,(पाच एच.पी.), रंजना नारायण जगधने (पाच एच.पी.) शंकर दगू मोकळ (साडेसात एच.पी.),प्रशांत प्रतापराव वाबळे (10 एच.पी.) वरील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची अज्ञात चोरट्याने मोटर फोडून त्यामधील कॉपरची वायर चोरून नेलेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून,पावसाच्या खंडामुळे ३५८ पैकी २६५ तालुके प्रभावित झाले आहेत.परिणामी राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती राज्य सरकारने घोषित करण्यात आली आहे.तर कोपरगाव तालुक्यातील गोदावरी काठी असलेल्या शेतकऱ्यांना नदीस पूर पाणी वाहून गेले असल्याने शेतीस थोडेबहुत पाणी खरीप पिकांस उपलब्ध झाले आहे.तर दुसरीकडे पावसाने डोळे वटारलेले आहे.कोपरगाव तालुका राज्य सरकारने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे.त्यामुळे हातचे खरीप पीक निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्याने तोंडाचे पाणी पळाले आहे.अशातच एक सुलतानी संकट नदी काठच्या शेतकऱ्यांना निर्माण झाले आहे.त्यात नदी काठी असलेल्या शेतकऱ्यांच्या विद्युत् मोटारीतील तांब्याच्या तारा चोरटे शेतात कोणी नाही ही संधी साधून चोरून नेत असल्याचे उघड झाले आहे.याचा कटू अनुभव कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना 28 सप्टेंबरच्या रात्री आला आहे.

दरम्यान त्यांच्या शेतात लक्ष ठेऊन त्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिला शेतकरी सुमनबाई मारुती गुजर (10 एच.पी.),अशोक रामभाऊ आहेर (साडेसात एच.पी.),कैलास मनोहर मोकळ,( पाच एच.पी.), रवींद्र वसंत मोकळ,(पाच एच.पी.), रंजना नारायण जगधने (पाच एच.पी.) शंकर दगू मोकळ (साडेसात एच.पी.),प्रशांत प्रतापराव वाबळे (10 एच.पी.) वरील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची अज्ञात चोरट्याने मोटर फोडून त्यामधील कॉपरची वायर चोरून नेलेली आहे.सदर विद्युत मोटारीचे त्यांच्या उपयोगी नसलेले सामान नदीपात्रात फेकून देत आहे.शेतकऱ्यांनी याचा दाहक अनुभव आधी घेतला असून काही शेतकऱ्यांनी त्यासाठी तांब्याच्या तारा ऐवजी अल्युमिनियम तारांचा वापर सुरू केला असून त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी लक्ष देऊन या प्रकरणी चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.आता या मागणी नंतर पोलिस काय कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागुन राहिले आहे.



