जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

“तालुक्याला दोन आमदार पण;एकही नाही दमदार”

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगावसह उतर नगर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आता प्रवाशांना आणि नागरिकांना नवी नाही.त्यामुळे संवेदनशीलता बोथट झालेल्या नागरिकांनी आता नेत्यांकडून अपेक्षा सोडून दिल्यात जमा आहेत.परिणामी कोणा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तरी त्यांच्या विचारी तो बावळट ठरत असण्याची शक्यता अधिक.त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उणीव तालुक्यात आणि जिल्ह्यात निर्माण झाली आहे.त्यातच आता तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था पाहून राष्ट्रवादीचे रांजणगाव देशमुख येथील राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे यांनी तेथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त आणि झगडफाटा-वडगाव पान या रस्त्यांसाठी थेट एक फलक लावून,“तालुक्याला दोन आमदार पण;एकही नाही दमदार” अशा आशयाचा फलक प्रसिद्ध करून वास्तव चित्र जनतेसमोर आणले असल्याने त्यांची चर्चा कोपरगावसह अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील अखंड हरिनाम सप्ताहकाळात लावलेला हाच तो फलक लक्ष वेधून घेत होता.

श्रीसाईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनदरम्यान सुमारे ७ कोटी रुपये खर्चून तयार केलेला चौपदरी रस्ता अवघ्या अडीच-तीन वर्षांतच खचला आहे.त्याच्या साईड गटारीच्या स्लॅपचे ढेकळे हाताने निघत असल्याचे संजय काळे यांनी सप्रमाण दाखवून दिली आहे.साईबाबा कॉर्नर ते संजीवनी कारखाना रस्त्याच्या कामांवरूनही दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.झगडेफाटा ते वडगाव पान,संजीवनी कारखाना ते संवत्सर,टाकळी फाटा ते धामोरी,कोपरव वैजापूर जुना मार्ग आदी रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि अरुंद वळणांमुळे कोपरगाव परिसरात सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत.काही अपघातांमध्ये प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला आहे.मात्र मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे असे ढोल बडवून सांगणाऱ्या नेत्यांनी या कामात कवडीची सुधारणा केली नाही हे विशेष !

  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था हा खरोखरच अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अहिल्यानगर-कोपरगाव महामार्गाचे काम,अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि खराब दर्जाच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांसह शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग गेल्या १५ ते २० वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहने अडकून तासनतास वाहतूक कोंडी होते.श्रीसाईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनदरम्यान सुमारे ७ कोटी रुपये खर्चून तयार केलेला चौपदरी रस्ता अवघ्या अडीच-तीन वर्षांतच खचला आहे.त्याच्या साईड गटारीच्या स्लॅपचे ढेकळे हाताने निघत असल्याचे संजय काळे यांनी सप्रमाण दाखवून दिली आहे.साईबाबा कॉर्नर ते संजीवनी कारखाना रस्त्याच्या कामांवरूनही दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.झगडेफाटा ते वडगाव पान,संजीवनी कारखाना ते संवत्सर,टाकळी फाटा ते धामोरी,कोपरव वैजापूर जुना मार्ग आदी रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि अरुंद वळणांमुळे कोपरगाव परिसरात सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत.काही अपघातांमध्ये प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला आहे,ज्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या होत्या.तरीही वास्तव काही बदलले नाही.मनमाड-नगर मार्गावर होणारी अवजड कंटेनर आणि ट्रकची वाहतूक रस्त्यांची दुरवस्था अधिक वेगाने वाढवत आहे.सावळीविहीर,पुणतांबा फाटा,कोपरगाव बेट,झगडेफाटा आदी ठिकाणावरील उड्डाणपूल हे असून अडचणं आणि नसून खोळंबा ठरत आला आहे.चार दिवस काम सुरू राहिले की सहा महिने बंद राहते अशी या रस्त्यांची गेली सव्वीस वर्षे स्थिती आहे.

  

    शिर्डी येथील उत्सव काळात या मार्गावरील वाहतूक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक आणि पालकमंत्री यांनी गेली 26 वर्षे झगडे फाटा ते वडगाव पान या मार्गावर वळवूनही या मार्गासाठी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री आणि समिती,जिल्हा पालकमंत्री आदींनी कवडीची तरतूद केली नाही.त्यांच्या या भीम पराक्रमाची दाखल,”वर्ड रेकॉर्ड” मध्ये करायलाच हवी.काही रस्त्याना आर्थिक तरतूद केली तर ती त्यांच्या संस्थांनासाठी वाट वाकडी करून केली असून आपले कारखाने,ट्रस्ट,दवाखाने आदींसाठी त्यानिधींची तरतूद करून आपण किती खालची पातळी गाठली आहे हे वारंवार दाखवून दिले आहे.विविध सामाजिक संस्थांनी पाठपुरावा करूनही त्यासाठी दमडीची तरतूद केली नाही हे विशेष ! याबाबत वारंवार सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आवाज उठवूनही अद्याप त्यांची दखल प्रशासनास घ्यावी वाटली नाही.शिवाय या नामुष्की बाबत ना राज्यकर्त्यांना कोणतीही लाज वाटत असताना दिसून येत नाही.परिणामी याची किंमत सामान्य नागरिक प्रवासी,साईभक्त आदींना चुकवावी लागत आहे.मात्र तरीही सामान्य नागरिक नाराज होऊन यांचेवर मतपेटीत ती नाराजी दाखवत नाही हे आणखी एक विशेष ! परिणाम आज समोर आहेच.नुकत्याच एका घटनेत दहीगाव बोलका कोपरगाव तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब साबळे हे गंभीर जखमी झाले आहे.त्याचे पडसाद आता उमटत आहे.

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचे सुरू असलेले आंदोलन.

  कोपरगाव तालुक्यात रांजणगाव देशमुख येथे ग्रामस्थांच्या वतीने व रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे नुकताच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता.त्यावेळी होणारी गर्दी लक्षणीय असते.याचा राजकीय फायदा कार्यकर्त्यांनी न उचलला तर नवल! कोपरगाव राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे यांनी ही संधी अचूक ओळखून झगडेफाटा ते वडगाव पान या मार्गाच्या कडेला भिंतीला लावून तालुक्यातील राजकीय नेत्यांना त्यांच्या योग्यतेबाबत आरसा दाखवला असल्याचे मानले जात आहे.त्यात लिहिलेला मजकूर खूपच बोलका असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,
          “तालुक्याला २ आमदार पण…!,तालुक्याला जायला एक पण रस्ता नाही दमदार…!
           तालुक्याला डबल आमदार पण…!,गावचा साठवण तलावाची क्षमता निम्यात…!
                               “२ आमदार पण…!,रोज रात्री लाईट जाते २ तास…!
                          (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,रांजणगाव देशमुख)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close