पर्यटन व तीर्थक्षेत्र
श्री साई पारायणची पशुपतीनाथ तीर्थयात्रा होणार संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
‘ॐ साई राम’च्या जयघोषात साईभक्तांना काशी-अयोध्या,नेपाळ पशुपतीनाथ व मनोकामना मंदिर दर्शनाची संधी उपलब्ध झाली आहे.शिर्डी ग्रामस्थांच्या आयोजनातून ‘श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६ (संकल्पपूर्ती)’ या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक कैलास कोते आणि विजय कोते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

पशुपतीनाथ म्हणजे सर्व सजीव आणि अजीव सृष्टीचे (पशूंचे) नाथ किंवा स्वामी भगवान शिव होय.असे मानले जाते की पशुपतिनाथाचे दर्शन आणि पूजन केल्याने मनुष्याला पापातून मुक्ती मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो.महाभारतकाळात महायुद्धानंतर स्वतः पांडवांनी आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी पशुपतिनाथ मंदिराला भेट दिली होती,असे मानले जाते.त्यामुळे भारतात या तीर्थक्षत्राला समाजमनात मोठे स्थान आहे.त्यामुळे शिर्डी आणि परिसरातील साईभक्ताना या तीर्थांचे दर्शन व्हावे यासाठी श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व श्री साई निर्माण ग्रुपचे कैलास कोते आणि विजय कोते यांनी या विशेष यात्रेचे योजन केले आहे.
नेपाळमधील काठमांडू येथे बागमती नदीच्या काठावर वसलेले पशुपतिनाथ मंदिर हे जगातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे हिंदू तिर्थक्षेत्र आहे.पशुपतिनाथ मंदिर हे एक नेपाळ देशातील काठमांडू मधील बागमती नदीच्या काठावर वसलेले शिव मंदिर आहे.या मंदिर संकुलाचा इ.स. १९७९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला.तसेच हे युनेस्कोच्या नेपाळ मधील जागतिक वारसा असलेलया काठमांडू व्हॅलीच्या सात स्मारकांपैकी एक मानले जाते.पशुपतीनाथ म्हणजे सर्व सजीव आणि अजीव सृष्टीचे (पशूंचे) नाथ किंवा स्वामी भगवान शिव होय.असे मानले जाते की पशुपतिनाथाचे दर्शन आणि पूजन केल्याने मनुष्याला पापातून मुक्ती मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो.महाभारतकाळात महायुद्धानंतर स्वतः पांडवांनी आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी पशुपतिनाथ मंदिराला भेट दिली होती,असे मानले जाते.त्यामुळे भारतात या तीर्थक्षत्राला समाजमनात मोठे स्थान आहे.त्यामुळे शिर्डी आणि परिसरातील साईभक्ताना या तीर्थांचे दर्शन व्हावे यासाठी श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व श्री साई निर्माण ग्रुपचे कैलास कोते आणि विजय कोते यांनी या विशेष यात्रेचे योजन केले आहे.

या यात्रेत श्री क्षेत्र काशी,अयोध्या,नेपाळमधील श्री पशुपतीनाथ,गोरखपुर आणि मनोकामना मंदिर आदी प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडणार आहे.विशेष म्हणजे आतापर्यंत तब्बल २५ हजार साईभक्तांनी १२ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेत सहभाग घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.या स्पेशल रेल्वेने होणार धार्मिक प्रवास यात्रेसाठी शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेने प्रवास होणार आहे.वाराणसी येथे आगमनानंतर गंगा आरतीचा अनुभव,त्यानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमी,कनक भवन,हनुमानगढी व राजदरबार आदींचे दर्शन घेण्यात येणार आहे.साईभजन संध्येनंतर रेल्वेने पुढील प्रवास केला जाणार आहे.
यानंतर नेपाळकडे प्रयाण करून काठमांडू येथे मुक्काम,श्री पशुपतीनाथ व गोरखपुर दर्शन,भजन संध्या तसेच काठमांडू दर्शनाचा कार्यक्रम आहे.पुढे मनोकामना मंदिर येथे दर्शन घेऊन नौतनवा येथे आगमन व तेथून विशेष रेल्वेने शिर्डीकडे परतीचा प्रवास होणार आहे.१ हजार ४०० साईभक्तांचे बुकिंग आता थोड्या जागा शिल्लक असल्याने या विशेष तीर्थयात्रेसाठी आतापर्यंत १हजार ४०० साईभक्तांनी बुकिंग केले असून आता थोड्या जागा शिल्लक असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.त्यामुळे इच्छुक साईभक्तांनी विलंब न करता आपले बुकिंग निश्चित करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. 29 ऑगस्ट शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरून दुपारी 2 वाजता निघणार आहे.त्यासाठी सर्व इच्छुकांनी तेव्हा सप्तपदी लॉन्स येथे जमावे असे आवाहन करण्यात आले आहे.त्यासाठी प्रवास शुल्क- नॉन एसी ट्रेन रुपये १४ हजार १००,थ्री टियर एसी ट्रेन रुपये १८ हजार १००,टू टियर एसी ट्रेन रुपये १९ हजार १००,यात्रेच्या शुल्कामध्ये दोन वेळचे जेवण,एक वेळचा नाश्ता तसेच चार व्यक्तींमागे एका खोलीची व्यवस्था करण्यात येणार आहे.पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी पूर्ण भाडे आकारले जाणार आहे.यात्रेसाठी बुकिंग करताना आधारकार्डची झेरॉक्स,मतदान कार्डची झेरॉक्स व पासपोर्ट फोटो सोबत आणावा.प्रवासादरम्यान मूळ आधारकार्ड जवळ ठेवणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.यात्रेच्या अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क -९९२१५२९९९९ / ९०९६९१९१९१ दिले आहे.श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व श्री साई निर्माण ग्रुप कैलास कोते,विजय कोते आदींनी दिली आहे.



