सहकार
गुजरातच्या सहकार प्रतिनिधींची…या पतसंस्थेला भेट

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
गुजरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष डॉ.जीवराजभाई गोधानी,संचालक अल्पेश धामेलिया,मुख्य कार्यकारी अधिकारी दुष्यनसिंह वाघेला,सुरत जिल्हा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी फेडरेशन एम.डी.रमेशभाई लाठीया,विविध सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदींनी १२० प्रतिनिधींनी नुकतीच समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेने विकसित केलेल्या सेल्फ बँकिंग,व्हाउचरलेस बँकिंग,ऑडिट कंट्रोल रूम,ऑनलाइन समता रिकव्हरी पॅटर्न,पेपरलेस बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या सुविधांची माहिती प्रतिनिधींना देण्यात आली.व्यवहारांमध्ये अचूकता,पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी या प्रणालींचा उपयोग केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.त्याचे गुजराती शिष्टमंडळाने स्वागत केले आहे.
महाराष्ट्र हे सहकार चळवळीचे केंद्र आहे आणि गेली चाळीस वर्ष,समता नागरी सहकारी पतसंस्था या चळवळीचे नेतृत्व करत उभी असल्याचे मानले जात आहे.कोपरगाव येथे मुख्यालय आणि २० पेक्षा अधिक शाखांच्या माध्यमातून,समता लोकांच्या मेहनतीच्या पैशावर मोठे आणि सातत्यपूर्ण परतावे देऊन त्यांचा विश्वास जपण्याचे काम करत आहे.या प्रवासात त्यांनी लोकांना योग्य आर्थिक सल्ला आणि सेवा देण्यासोबतच,बदलत्या बँकिंग क्षेत्राशी सुसंगत आधुनिक सेवा देणारी संस्था म्हणूनही ओळख निर्माण केली आहे.त्यात एका क्लिकवर घरबसल्या विविध बँकिंग सेवा आणि खात्याची माहिती मिळवणे.मायक्रो एटीएम द्वारे पतसंस्था क्षेत्रात प्रथमच डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा,कागदपत्रांशिवाय आधुनिक आणि सुरक्षित पद्धतीने डिजिटल व्यवहार.आर.ती.जी.एस.एन.इ.एफ.टी.आणि आय.एम.पी.एस.द्वारे सुरक्षित व वेगवान पैसे पाठवणे,डिजिटल पेमेंटसाठी युपीआय सुविधांचा समावेश आहे.त्यामुळे ही सहकारी पतसंस्था राज्यात आणि देशात अग्रणी ठरत आली आहे.त्यामुळे या संस्थेला राज्यातून आणि परप्रांतातून अनेक सहकाराचे अभ्यासू नागरिक,प्रतिनिधी भेट देत असतात.

दरम्यान नुकतीच गुजरात येथील सहकारातील तज्ञ पथकाने त्यासाठी भेट दिली असून त्यावेळी जेठालाल पटेल,अशोकशेठ जानी यांचेसह गुजरातमधील १२० प्रतिनिधींनी समता पतसंस्थेच्या विविध तंत्रज्ञानावर आधारित सुविधांची माहिती घेतली आहे.या शिष्टमंडळात ४० महिला प्रतिनिधी होत्या.यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक जितूभाई शहा,कचरू मोकळ,अश्विन व्यास यांच्यासह मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गुजरातमधून आलेल्या प्रतिनिधींना संस्थेच्या कार्याची माहिती त्यांच्या भाषेत समजावी,यासाठी समता पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद पटेल व संचालिका अक्षरा अनुप पटेल यांनी चित्रफितीच्या माध्यमातून गुजराती भाषेत विविध सेवा व उपक्रमांचे सादरीकरण केले आहे.गुजराती भाषेतून समता विषयी परिपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संचालिका अक्षरा अनुप पटेल यांचे अभिनंदन केले आहे.संस्थेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो,याचा परिचय या माध्यमातून करून देण्यात आला आहे.समता पतसंस्थेने विकसित केलेल्या सेल्फ बँकिंग,व्हाउचरलेस बँकिंग,ऑडिट कंट्रोल रूम,ऑनलाइन समता रिकव्हरी पॅटर्न,पेपरलेस बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या सुविधांची माहिती प्रतिनिधींना देण्यात आली.व्यवहारांमध्ये अचूकता,पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी या प्रणालींचा उपयोग केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यावेळी संस्थेच्या विविध सुविधा व उपक्रमांबरोबरच तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांना एक हक्काचे केंद्र उपलब्ध करून दिलेले ‘सहकार उद्योग मंदिर’ आणि ‘समता सहकार मिनी मॉल’ ची संकल्पना व कार्य याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
दरम्यान यावेळी कोपरगाव गुजराती मित्रमंडळाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले आहे.तर उपस्थितांचे आभार यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक जितूभाई शहा यांनी मानले आहे.



