जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षेत याविद्यालयाचे सर्वाधिक विद्यार्थी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

   शिक्षण विभागाने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही राज्यात मोठी कामगीरी केली असून या शाळेचे 129 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे.यातील घनश्याम ढेपे राज्यात अकरावा आला.या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे एकोणीस लाख पस्तीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होईल.संपूर्ण महाराष्ट्रात एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आत्मा मालिकेने सलग तेराव्या वर्षी पटकावला  आहे.

“आत्मा मालिक पॅटर्न पून्हा एकदा सिध्द झाला असून विशेष तयारी वर्ग,सुपर नाईट अभ्यासिका,सुवर्ण पहाट अभ्यासिका,स्मार्ट सण्डे उपक्रम,तज्ज्ञांचे मार्गदर्शन,दिर्घ सुट्यांमध्ये विशेष तयारी शिबिरे,सराव परीक्षांची नियोजनबद्ध आखणी,विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन वर्ग,विद्यार्थी दत्तक योजना,विद्यार्थी व शिक्षक प्रोत्साहन योजना हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे हे हे फलीत आहे”-नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष,विश्वात्मक,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण.

   याबाबत माहिती देताना प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले की,”‘इयत्ता पाचवी,सातवी आणि आठवीची गुणवत्ता यादि नुकतीच जाहिर झाली.इयत्ता पाचवी चे 10 विद्यार्थी, इयत्ता सातवी चे 22 विद्यार्थी तर इयत्ता आठवी चे 97 विद्यार्थी असे एकूण 129 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.आजपर्यंत या गुरूकुलाच्या 817 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवीले.त्यापैकी 17 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले.त्यात घनश्याम ढेपे -276 गुण -राज्य गुणवत्ता यादीत अकरावा,श्रेयश धावडे -260, शिवम जाधव-258, साहिल पवार-256, श्रीकांत कोतकर- 254, प्रथमेश सांगळे-252,गितेश उधाण-252,कृष्णा धुमाळ-250,स्वरा लांडगे-250,आयुष वाळुंज-250,युवराज डोके-248,आयुष कानडे-248,पवन मराठे-242, रोशन पवार -242, अभिमन्यू कानवडे-240, गजानन म्हस्के-240, सिद्धार्थ साळवी -240, अध्ययन मुदगुल-238, आविष्कार वाकळे-238, साई घोडके-234 आराध्या गुरसळ -234, गौरव मैंड -232 यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना विषय शिक्षक पंकज गुरसळ,रिना कोरे,शिवम् तिवारी,सुवर्णा ढगे,रोहिणी होन,वैशाली गोरे,अश्विनी टुपके,अनिल सोनवणे,सुर्यकांत कराळे,दिपाली भोसले,दिनेश नाईक, रूपाली होन,मनोहर वैद्य,पुनम राऊत,सुलोचना गाढवे,अनिल डुकरे,कल्याणी जपे यांचे मार्गदर्शन लाभले होते.या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी आणि विश्वस्तांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close