जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सीताबाई शिंदे यांचे निधन

न्यूजसेवा


संवत्सर-(वार्ताहर)

  कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील कार्यकर्ते बाबासाहेब रामभाऊ शिंदे यांच्या मातोश्री सीताबाई रामभाऊ शिंदे (वय -७८) यांचे शनिवार दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.संवत्सर येथील अमरधामध्ये सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्या संजीवनी कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग शिंदे यांच्या चुलती होत्या.

स्व.सीताबाई शिंदे यांचे छायाचित्र.
   स्व.सीताबाई शिंदे या शेतकरी कुटुंबातील होत्या.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    स्व.सीताबाई शिंदे या शेतकरी कुटुंबातील होत्या.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.त्यांच्या पश्चात बाबासाहेब शिंदे व राजेंद्र शिंदे ही दोन मुले,तीन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर परिसरातील नातेवाईक,तसेच कार्यकते यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

  दरम्यान या घटनेबद्दल गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे,भाऊसाहेब ढेपले आदींनी शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close