निधन वार्ता
संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक काळकुंद्री यांचे निधन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्व.खा.सूर्यभान पाटील यांचे खंदे समर्थक मुकुंदराव काळकुंद्री (वय-75) यांचे आज सकाळी 10.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात 05 भाऊ,02 बहिणी,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर थोड्याच वेळात कोपरगाव येथील गोदावरी तीरी असलेल्या नगरपरिषद अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.मुकुंदराव काळकुंद्री यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा,संघकार्य आणि समाजसंस्कारासाठी समर्पित केले.उत्तरार्धात कोपरगावचे ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेशाच्या सेवेत त्यांनी भक्तिभावाने आयुष्य व्यतीत केले.संघाच्या प्रत्येक उत्सवात त्यांच्या ओजस्वी आवाजातील पद्य हे प्रेरणेचे स्रोत ठरायचे.”बलसागर भारत होवो” हे त्यांनी गायलेले गीत आजही असंख्य स्वयंसेवकांच्या स्मरणात कायम आहे.त्यांनी सन -1978 साली आणीबाणीच्या काळात राजबंदी म्हणून कारावास भोगला होता.ते विधानपरिषदेचे माजी सभापती स्व.ना.स.फरांदे,माजी खा.भीमराव बडदे आदींचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात असत.
स्व.मुकुंदराव काळकुंद्री यांनी उभे आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजपला वाहिले होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेक संघटनेचे कोपरगाव येथील 13 वर्षे शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून जबाबदारी निभावली होती.याखेरीज त्यांनी याच संघटनेचे तालुका कार्यवाहक म्हणून 06 वर्षे जबाबदारी सांभाळली होती.त्यांनी आपले जवळपास 50 वर्षाचे आयुष्य भाजप आणि संबंधित संघटनेसाठी वाहिले होते.ते तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष,विधानपरिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष खा.सूर्यभान पाटील वहाडणे,विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.ना.स.फरांदे,माजी खा.भीमराव बडदे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते.

स्व.मुकुंदराव काळकुंद्री यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा,संघकार्य आणि समाजसंस्कारासाठी समर्पित केले.उत्तरार्धात कोपरगावचे ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेशाच्या सेवेत त्यांनी भक्तिभावाने आयुष्य व्यतीत केले.संघाच्या प्रत्येक उत्सवात त्यांच्या ओजस्वी आवाजातील पद्य हे प्रेरणेचे स्रोत ठरायचे.”बलसागर भारत होवो” हे त्यांनी गायलेले गीत आजही असंख्य स्वयंसेवकांच्या स्मरणात कायम आहे.त्यांनी सन -1978 साली आणीबाणीच्या काळात राजबंदी म्हणून कारावास भोगला होता.त्यांनी शिशू विकासमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरवून त्यांनी परिसरातील असंख्य मुलांना एकत्र आणले.मैदानी खेळ,शिस्त,संघभावना,देशप्रेम आणि संस्कार यांचे धडे त्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय दिले.त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनातून घडलेली अनेक मुले आज समाजात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.ते विधानपरिषदेचे माजी सभापती स्व.ना.स.फरांदे,माजी खा.भीमराव बडदे आदींचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात असत.
त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,भाजप सोशल मिडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष समीर आंबोरे,वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी,टेकचंद खुबानी,माजी शहर प्रमुख प्रभाकर वाणी,विनायक गायकवाड,योगेश वाणी,माजी तालुकाध्यक्ष नामदेवराव जाधव,वाल्मिकराव भोकरे,सुभाष दवंगे,चेतन खुबानी,विनीत वाडेकर,चेतन राणे,गणेश शिंदे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



