जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
मनोरंजन

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा आणि मदत यशाला कारणीभूत-प्रवीण तरडे

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  देऊळबंद -०२ या सिनेमाचा जो नफा येईल तो आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याचे चित्रपट चालू व्हायच्या वेळेला निर्माते आणि कोपरगावचे मूळ रहिवासी कैलास वाणी यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे कदाचित हा चित्रपट जास्त चालत असावा असे प्रतिपादन देऊळबंद ०२ चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी शिर्डी येथील पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

 

प्रवीण विठ्ठल तरडे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक भारतीय अभिनेते,चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत,जे त्यांच्या देऊळ बंद,मुळशी पॅटर्न,सरसेनापती हंबीरराव या मराठी चित्रपटांसाठी विशेष ओळखले जातात.प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता.या चित्रपटातील प्रवीण यांच्या अभिनयाचंही विशेष कौतुक झालं होतं.प्रवीण तरडे सध्या मराठीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत.या निर्मितीमुळे ते पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले आहे.

  कोपरगाव येथील रहिवासी आणि चित्रपट निर्माते कैलास वाणी निर्मित प्रवीण तरडे लिखित,दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. या चित्रपटाने अवघ्या वीस दिवसांत रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाच्या कमाईला मागे टाकलं असून चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.आतापर्यंत ८० कोटींची कमाई झाली असून याबाबत लोकांचे औस्तुक्य निर्माण झाले आहे.त्यामुळे दिवसेदिवस प्रतिसाद मिळत आहे.या पार्श्वभूमीवर आज शिर्डी येथे रोटरी क्लब ऑफ साईबाबा यांचे वतीने पत्रकारांसाठी वार्तालाप आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते.

कैलास वाणी हे एक प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते व कोपरगाव येथील मूळ निवासी आहेत,जे प्रामुख्याने ‘वटवृक्ष एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थेअंतर्गत काम करतात. त्यांची ‘देऊळ बंद’ या सुपरहिट चित्रपटाच्या निर्मितीसाठी ओळख आहे.त्यांनी २०१५ मध्ये ‘देऊळ बंद’ या यशस्वी चित्रपटाची निर्मिती केली.या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी यांनी केले होते. त्यांची निर्मिती असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘देऊळ बंद २’ नुकताच रिलीज झाला आहे.’देऊळ बंद २’ चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्यातील मोठा हिस्सा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून केली आहे.त्यामुळे हे यश प्राप्त झाले असल्याचे मानले जाते.

    त्यावेळी पुढे बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की,”माझे सिनेमे चांगले चालले आहे.दक्षिण भारतीय चित्रपट चालतात पण आपले मराठीच का चालत नाही याचा विचार केला आहे.मराठी सिनेमा कोठे कमी पडतो याचा विचार केला.जेवढा वेळ निर्मितीला दिला तेवढाच वेळ प्रसिद्धीस दिला आहे.अशी पश्चिम महाराष्ट्रात फिरलो आहे आणि जनजागृती केली आहे.पुणे मुंबईतून सर्वाधिक म्हणजे जवळपास ७० टक्के कलेक्शन होते.त्यामुळे सर्वाधिक लक्ष पुरवले आहे.पश्चिम महाराष्ट्र लक्ष केंद्रित केले आहे.अमरावती,अकोला,शेगाव आदी ठिकाणी सिनेमागृहात भेट दिली.शेगाव मध्ये जाणून प्रेक्षकांना भेटलो पण गजानन महाराजांचे दर्शन घेतले आहे.कारण चित्रपटाच्या प्रसिद्धीस आलो दर्शनासाठी नाही.दर्शनासाठी स्वतंत्र येऊ असे त्यांनी सांगून अनेकांची मने जिंकली आहे.नागपूर,अमळनेर आदी ठिकाणाहून  कलेक्शन वाढले आहे.सिनेमाचा जो नफा येईल तो आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याचे चित्रपट चालू व्हायच्या वेळेला जाहीर केले आहे.त्यामुळे कदाचित हा चित्रपट जास्त चालत असावा असे म्हटले आहे.आधीचे तिन्ही सिनेमे मोठ्या चॅनलचे आहे.पण येथे उलट स्थिती आहे.प्रसिद्धीसाठी कोणी मोठी हस्ती नाही.मोहन जोशी तब्बतीमुळे बाहेर पडू शकले नाही.त्यामुळे आजवरचे मोठे यश आहे. आणि हे यश फक्त माऊथ पब्लिसिटीवर असल्याचा दावा केला आहे.१० कोटींचा सिनेमा ८० कोटींवर गेला हे कोणा चॅनलची मक्तेदारी नाही. मुळशी पॅटर्न या चित्रपट चालणार नाही अशी अनेकांनी भविष्यवाणी केली होती ते सपशेल फोल ठरवली आहे.ग्रामीण भागातील अभिनेते शोधले आहे.त्यात नगर,नाशिक,धाराशिव मधील नवीन चेहरे आहे.मी स्वतःला सेलिब्रिटी समजत नाही.या चित्रपटाचा सेलिब्रिटी महाराष्ट्रातील प्रेक्षक असल्याचा त्यांनी शेवटी दावा केला आहे.

देऊळबंद ०२ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा सत्कार करताना लायन्स क्लबचे सदस्य आणि शिर्डीचे नागरिक.

  यावेळी त्यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नाला मनमोकळेपणाने उत्तर दिले आहे.मराठी चित्रपटाला नक्कीच भविष्य असल्याचा दावा केला आहे.त्यांनी स्व.अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,मनसेचे राज ठाकरे यांच्या गुणांचा गौरव केला व त्यांच्यातील चांगले गुण का घ्यायचे नाही असा दावा केला आहे.काही विनोदी प्रश्नाला तेवढेच विनोदी उत्तरे देऊन मनमुराद हसवले आहे.

शिर्डीत सत्कार करताना श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर आणि त्यांचे सहकारी दिसत आहे.

  यावेळी कैलास वाणी म्हणाले की,मी स्वतःला धन्यवान समजतो हे काम आमच्या वाट्याला आहे.प्रवीण तरडे हे अत्यंत मेहनती आणि कष्टाळू आहे.आणि जो नफा येईल यातील निधी आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला देणार असल्याचे जाहीर केलं आहे.आगामी काळात येणारी रक्कम आपण घेणार नसल्याचे कैलास वाणी यांनी जाहीर केले आहे.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईबाबांचे अध्यक्ष राजेंद्र कोते यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार आर्किटेक्ट रविकिरण डाके यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close