जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव शहरात उद्या रक्तदान शिबिर

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव येथील पोस्ट ऑफिस व गोकुलधाम गौरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि.१४ जून रोजी सकाळी ०९ वाजता कोपरगाव पोस्ट ऑफीस धारणगांव रोड या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अमित जैन यांचे वतीने करण्यात आले आहे.

रक्तदान केल्याने केवळ गरजू रुग्णांचे प्राण वाचत नाहीत, तर रक्तदात्याच्या स्वतःच्या आरोग्यालाही अनेक मोठे फायदे मिळतात.शरीरात लोहाचे प्रमाण जास्त झाल्यास नसा ब्लॉक होतात.नियमित रक्तदानाने लोहाची पातळी नियंत्रित राहून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.परिणामी अलीकडील काळात रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.कोपरगावात पोस्ट ऑफिस व गोकुलधाम गौरक्षा केंद्र यांनी असाच उपक्रम हाती घेतला आहे.

  रक्तदान केल्याने केवळ गरजू रुग्णांचे प्राण वाचत नाहीत, तर रक्तदात्याच्या स्वतःच्या आरोग्यालाही अनेक मोठे फायदे मिळतात.शरीरात लोहाचे प्रमाण जास्त झाल्यास नसा ब्लॉक होतात.नियमित रक्तदानाने लोहाची पातळी नियंत्रित राहून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.परिणामी अलीकडील काळात रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असून महाराष्ट्र या उपक्रमात आघाडीवर आहे.कोपरगाव शहरही त्यास अपवाद नाही.

  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील गोरक्षासह अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.ही संस्था आणि तिचे कार्यकर्ते गोवंश संवर्धनात मोठी भूमिका निभावत आहे.त्यांनी आता आणखी एक कार्यक्रमाची भर घातली असून उद्या रविवार दि.१४ जून रोजी सकाळी ०९वाजता पोस्ट कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे.याचा कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमित जैन व रवींद्र परदेशी यांनी शेवटी केले आहे.त्यासाठी त्यांनी पुढील संपर्क क्रमांक दिले आहे.7057942240,8888788800.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close