पणन
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचे राजीनामास्र!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वकाही अलबेल नाही; काही तरी गैरव्यवहार असून आ.कोल्हे गट वगळता अन्य गटांनी बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढले होते.आता याची सुरुवात आज झाली असून यातील आ.आशुतोष काळे गटाच्या 05 संचालकांनी आज आपले राजीनामे सोपवले असल्याचे उघड झाल्याने आगामी काळात कृषी उत्पन्न बाजार समिती राजकीय आखाडा बनणार असल्याचे उघड आले आहे.याला कृषी उत्पन्न बाजार समितींच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

तीन वर्षापूर्वी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपन्न झाली त्यावेळी आ.काळे,माजी आ.कोल्हे प्रत्येकी 06 जागा तर राजेश परजणे,नितीन औताडे गटाला प्रत्येकी 02 जागा मिळाल्या होत्या.तर व्यापारी प्रतिनिधी 02 आणि हमाल मापाडी यांना 01 जागा दिली होती.त्यातील दोन व्यापारी आणि हमाल मापाडी संचालक कोल्हे गटाकडे ओढले गेले आहे.त्यामूळे त्यांचे राजकीय बलाबल हे तब्बल 10 वर पोहचले असल्याचे मानले जात आहे.औताडे गटाचे दोन संचालक हे निवडणुकीत बिपीन कोल्हे यांनी त्यांना उमेदवारी देण्यात पुढाकार घेतल्याने त्यांचे ऋण मानत असल्याने काळे गटाचे राजकीय गणित कोलमडले असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे त्यांनी राजीनामास्त्र बाहेर काढले आहे.तर परजणे गटाने,”थांबा..,पहा..,जा…! ची भूमिका घेतली आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने दि.29 मार्च दुपारी २.४५ वाजता १.७३ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम आ.काळे व राजेश परजणे यांच्या संचालकांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचे शुभहस्ते व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता.त्याच वेळी आगामी काळात कृषी उत्पन्न बाजार समितीत शिमगा होणार असल्याचे सूतोवाच अनेकांनी केले होते.त्याची पहिली चुणूक पहायला मिळाली होती.त्यावेळी बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,विवेक कोल्हे यांनी अनुपस्थित संचालकांवर चांगलीच आगपाखड केली होती.त्यानंतर आगामी कालखंडात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलणार असल्याचे सूतोवाच झाले होते.आज त्याचे प्रत्यय आला असल्याचे मानले जात आहे.आज कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा होती.त्या सभेपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या व आ.काळे गटाच्या संचालकांनी आपले राजीनामे बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांचेकडे सोपवले आहे.

दरम्यान त्यानंतर सदर आ.काळे गटाच्या संचालकांनी तेथून काढता पाय घेतला होता.त्यानंतर मासिक मीटिंग झाली मात्र कोरम पूर्ण होत नसल्याने कोल्हे गटाने त्यासाठी औताडे गटांच्या संचालकांना बोलावून घेऊन त्यांची मदत घेतली असून कोरम पूर्ण करून आजची मीटिंग पूर्ण करून आपला कार्यभाग साधला आहे.त्या मीटिंगमध्ये त्यांनी ते राजीनामे स्वीकारून पुढे जिल्हा कार्यवाहीसाठी जिल्हा सहकारी निबंधक यांचेकडे मंजूरीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान त्यानंतर सदर आ.काळे गटाच्या संचालकांनी तेथून काढता पाय घेतला होता.त्यानंतर मासिक मीटिंग झाली मात्र कोरम पूर्ण होत नसल्याने कोल्हे गटाने त्यासाठी औताडे गटांच्या संचालकांना बोलावून घेऊन त्यांची मदत घेतली असून कोरम पूर्ण करून आजची मीटिंग पूर्ण करून आपला कार्यभाग साधला आहे.त्या मीटिंगमध्ये त्यांनी ते राजीनामे स्वीकारून पुढे जिल्हा कार्यवाहीसाठी जिल्हा सहकारी निबंधक यांचेकडे मंजूरीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.याबाबत विश्वसनीय सूत्रांची माहिती घेतली असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
दरम्यान आ.काळे गटाने आधी अविश्वास टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात राजकीय बलाबल जुळले नाही परिणामी त्यांनी त्यातून राजीनामास्त्र बाहेर काढले असल्याचे माहिती मिळत आहे.मात्र खरे कारण हे अडीच वर्षांनी कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा देणे अपेक्षित असताना त्यांनी त्याला कोलदांडा घातल्याने खंडीच्या वरणाचा नाश झाला असल्याचे काळे गट समजत आहे.परिणामी आज राजकीय शिमगा सुरू झाला असल्याचे मानले जात आहे.
याबाबत खरे तर तीन वर्षापूर्वी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपन्न झाली त्यावेळी आ.आशुतोष काळे,माजी आ.कोल्हे प्रत्येकी 06 जागा तर राजेश परजणे,नितीन औताडे गटाला प्रत्येकी 02 जागा मिळाल्या होत्या.तर व्यापारी प्रतिनिधी 02 आणि हमाल -मापाडी यांना 01 जागा दिली होती.त्यातील 02 व्यापारी आणि हमाल मापाडी संचालक कोल्हे गटाकडे ओढले गेले आहे.त्यामूळे त्यांचे राजकीय बलाबल हे तब्बल 10 वर पोहचले असल्याचे मानले जात आहे.औताडे गटाचे दोन संचालक हे निवडणुकीत बिपीन कोल्हे यांनी त्यांना उमेदवारी देण्यात पुढाकार घेतल्याने त्यांचे ऋण मानत असल्याचे समजत आहे.तर त्याच वेळी आ.काळे यांनी त्या गटाला मान्यता दिली नव्हती त्यामुळे त्यांची काळे गटावर ऐतराजी असल्याचे मानले जात आहे.याशिवाय कोल्हे गटाने त्यांना उपबाजाराचे गाजर टांगून ठेवले ते वेगळेच.परिणाम समोर आहेच.मध्यंतरीच्या मार्च महिन्यात संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपली उपबाजाराची दिड तांदळाची खिचडी शिजविण्यासाठी पणन मंत्री यांचे कार्यक्रमात बहिष्कार टाकला होता असल्याचे समजते आहे.त्यामुळे आ.काळे गटाने आधी अविश्वास टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात राजकीय बलाबल जुळले नाही परिणामी त्यांनी त्यातून राजीनामा अस्त्र बाहेर काढले असल्याचे माहिती मिळत आहे.मात्र खरे कारण हे अडीच वर्षांनी कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा देणे अपेक्षित असताना त्यांनी त्याला कोलदांडा घातल्याने खंडीच्या वरणाचा नाश झाला असल्याचे काळे गट समजत आहे.त्यामुळे आगामी काळ हा कोल्हे गटासाठी आणीबाणीचा राहणार असल्याचे दिसू लागले असले तरी काळे आणि कोल्हे गट किती ताणनार की समेट घडवणार हे आगामी काळात उघड होणार आहे.



