निधन वार्ता
लक्ष्मीबाई रानोडे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी राजेंद्र बन्सी रानोडे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बन्सी रानोडे यांचे शुक्रवार दि.२२ मे रोजी सायंकाळी निधन झाले आहे.मृत्युसमयी त्या ९० वर्षाच्या होत्या.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.यावेळी मोठा जनसमुदाय याप्रसंगी उपस्थित होता.

स्व.लक्ष्मीबाई ह्या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या होत्या.गृहिनी म्हणून त्यांनी संसाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.महानुभव पंथाच्या विचाराच्या असल्याने घरात धार्मिक वातावरण त्यांनी निर्माण केलेले होते.
स्व.लक्ष्मीबाई ह्या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या होत्या.गृहिनी म्हणून त्यांनी संसाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.महानुभव पंथाच्या विचाराच्या असल्याने घरात धार्मिक वातावरण त्यांनी निर्माण केलेले होते.संवत्सर परिसरात त्यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली होती.त्यांच्या पश्चात मुलगा राजेंद्र रानोडे,पाच विवाहीत मुली,सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे. लक्ष्मीबाई यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी श्रध्दांजली अर्पण करून निधनाबदल शोक व्यक्त केला आहे.अंत्यविधीसाठी ग्रामस्थ,नातेवाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


