निधन वार्ता
रेखाताई आचारी यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायतीचे माजी लिपीक सुरेश बापुराव आचारी यांच्या पत्नी रेखाताई सुरेश आचारी यांचे बुधवार दि. १३ मे रोजी सायंकाळी निधन झाले. मृत्युसमयी त्या ६५ वर्षाच्या होत्या. संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा जनसमुदाय याप्रसंगी उपस्थित होता.

स्व.रेखाताई आचारी या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या होत्या.गृहिनी म्हणून त्यांनी संसाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.परिसरात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली होती.
स्व.रेखाताई आचारी या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या होत्या.गृहिनी म्हणून त्यांनी संसाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.परिसरात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली होती.अर्धांगवायुच्या उपचारासाठी त्या वनसगांव ( ता. निफाड ) येथे गेलेल्या होत्या. बुधवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला.रुग्णालयात हलविण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती सुरेश बापुराव आचारी,मुलगा पंकज सुरेश आचारी, सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
संवत्सरचे कार्यकर्ते अनिल आचारी यांच्या रेखाताई या चुलत भावजई होत्या.रेखाताई यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील,संवत्सरचे माजी उपसरपंच विवेक परजणे पाटील,माजीसरपंच सुलोचना ढेपले यांनी श्रध्दांजली अर्पण करून निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.अंत्यविधीसाठी ग्रामस्थ, नातेवाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

