जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे पदस्थापना शिबिर उत्साहात संपन्न!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  “गुणवत्तापूर्ण शिक्षण,अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाने नेमणूक क्षेत्रात पुन्हा एकदा यश संपादन केले आहे.महावियाल्याच्या या यशाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सोमैया महाविद्यालयात पदस्थापना प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांसमवेत यशस्वी विद्यार्थी.
  दरम्यान,महाविद्यालयातील सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता,लक्षवेधी निकाल,आधुनिक प्रयोगशाळा,करिअर मार्गदर्शन व वाढत्या पडस्थापनेच्या (प्लेसमेंट) संधी पाहता विद्यार्थ्यांनी के.जे. सोमैया महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले उज्ज्वल भविष्य साकार करावे,असे संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी केले आहे.

  याबाबत महाविद्यालयाने एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,” महाविद्यालयात नुकताच किनोमेरा बायोसायन्स प्रा.ली.या नामांकित औषध कंपनीचे पदस्थापना शिबिर उत्साहात पार पडले आहे.या प्रक्रियेत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री च्या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली”, आहे अशी माहिती प्राचार्य प्रा. डॉ.विजय ठाणगे यांनी दिली आहे.

  या संदर्भात अधिक माहिती देताना रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एन.टी.ढोकळे म्हणाले की,”सदर पदस्थापना प्रक्रियेत अमोल वाबळे,प्रतीक रोहमारे,राकेश बोरसे,ऋषिकेश सालमुठे,वैभव गायकवाड,साईनाथ जेजुरकर, विशाल गायकवाड व अण्णासाहेब सोमासे या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान,प्रयोगशाळेतील कौशल्य तसेच मुलाखतीतील आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळविले असल्याची माहिती दिली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालय परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षण,सराव मुलाखत,पेशा (करिअर) मार्गदर्शन आणि संशोधनाभिमुख शिक्षण दिले जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळत असल्याचे सांगण्यात आले.

   दरम्यान विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.विजय ठाणगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

  या पदस्थापना(प्लेसमेंट) प्रक्रियेसाठी कंपनीचे शिबिर प्रमुख ज्ञानेश्वर पाचरणे व अभिजित घोगरे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन.टी.ढोकळे,प्रा.एस.एस.नागरे,डॉ.एस.
जी.कोंडा,प्रदीप शेलार,ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा.डॉ.आर.ए.जाधव.प्रा.विजय सोमासे,प्रा.नेहा गुरावे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय प्रा.डॉ.गणेश शिंदे, कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

दरम्यान,महाविद्यालयातील सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता,लक्षवेधी निकाल,आधुनिक प्रयोगशाळा,करिअर मार्गदर्शन व वाढत्या पडस्थापनेच्या (प्लेसमेंट) संधी पाहता विद्यार्थ्यांनी के.जे. सोमैया महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले उज्ज्वल भविष्य साकार करावे,असे संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close